Happy Birthday Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन याने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्युजी’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरच्या सुरुवातीलाच अभिषेकला ‘गुरू’, ‘धूम’, ‘बंटी और बबली’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अभिषेकने नेहमीच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.

आता अभिषेकला या इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज अभिनेता ( ५ फेब्रुवारी ) त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.

आज वाढदिवसानिमित्त संपूर्ण मनोरंजन विश्वातून अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा खास पोस्ट शेअर अभिषेक बच्चनचं कौतुक केलं आहे. तसेच मोठ्या भावाप्रमाणे कायम साथ दिली यासाठी रितेशने त्याचे आभारही मानले आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. याशिवाय या दोघांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्र होस्ट म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे.

रितेश देशमुखची पोस्ट

रितेश देशमुख अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहितो, “प्रिय, अभिषेक बच्चन…तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात…हे मी शब्दांत सांगू शकत नाही. तुम्ही नेहमीच मला मोठ्या भावाप्रमाणे साथ दिलीत. या खास दिवशी मी प्रार्थना करतो की, तुम्हाला भरपूर प्रेम अन् उत्तम आरोग्य लाभो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा My Brother. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. Happy Birthday Abhishekh Bachchan.”

दरम्यान, रितेश देशमुखने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “याला म्हणतात खरी मैत्री”, “खरे मित्र”, “जगातील बेस्ट फ्रेंडशिप दादा”, “बडे मिया छोटे मिया”, “हाऊसफुलच्या पुढच्या भागाचं शूटिंग करताय का?”, “पोस्ट किती छान लिहिलीये” असं नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत लिहिली आहे.

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता काही महिन्यांपूर्वी ‘हाऊसफुल ५’ या मल्टीस्टारर सिनेमात झळकला होता. याशिवाय यंदा तो शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘किंग’ या बहुप्रतीक्षित सिनेमातही झळकणार आहे.