Genelia & Riteish Deshmukh Funny Video : जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर रितेश-जिनिलीयाच्या पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. चित्रपटांव्यतिरिक्त दोघंही इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. सध्या या जोडप्याने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
जिनिलीया व रितेश देशमुख यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा मूळ ऑडिओ हिंदीमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये रितेश पुस्तक वाचत बसलेला असतो आणि इतक्यात त्याला जिनिलीयाचा आवाज येतो. ती म्हणत असते “सॉरी यार…”
आता बायकोचं बोलणं ऐकून रितेश तिला “It’s Okay” म्हणण्यासाठी खुर्चीवरून उठतो. जिनिलीया आपल्याला सॉरी म्हणतेय हे ऐकल्यावर एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. पण, हा आनंद एका सेकंदात दूर होऊन रितेशच्या चेहऱ्यावर नाराजी पसरणार आहे. कारण, जिनिलीया रितेशला नव्हे तर फोनवर तिसऱ्याच व्यक्तीला ‘सॉरी’ म्हणत असते. जिनिलीया फोनवर बोलतेय हे पाहिल्यावर अभिनेत्याचा चांगलाच भ्रमनिरास होतो.
रितेश-जिनिलीयाचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. रितेशने या व्हिडीओला, “माझ्या मनात एक आशेचा किरण होता” म्हणजेच जिनिलीयाचं सॉरी ऐकून ती आपल्याशी बोलतेय अशी भाबडी आशा रितेशला होती.
“बापरे भन्नाट व्हिडीओ”, “भाऊ-वहिनी मस्त व्हिडीओ”, “Too Funnyyy फेव्हरेट कपल”, “वहिनी भाऊंचा नेहमीच पचका करतात”, “Sorry ची अपेक्षा बायकोकडून करणं म्हणजे उन्हाळ्यात बर्फ पडण्याची वाट पाहणं”, “बायको तुम्हाला Sorry बोलेल..? हे सात जन्मात शक्य नाही” अशा भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या या व्हिडीओला अवघ्या तीन तासांत २.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर रितेश-जिनिलीया दोघंही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेशने केलं असून, जिनिलीयाने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती.
