रितेश देशमुख व फराह खान यांनी अलीकडेच आलेल्या ‘लॉक अप सीझन २’चं सूत्रसंचालन केलं. होतं. दोघांनी पहिल्यांदाच एकत्र एका रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन केलं. अशातच आता नुकतंच त्यांनी एकत्र एका कार्यक्रमात हजेरी लावलेली. यावेळी रितेशने फराहबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना तिच्या सतत बडबड करण्याच्या स्वभावाबद्दल तक्रार केली.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या FICCI FRAMES २०२६च्या कार्यक्रमात रितेश देशमुख, फराह खानसह बॉलीवूडमधील इतर काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता कोळीने त्यांची मुलाखत घेतली.याचवेळी रितेशने गंमतीत फराहची मस्करी करत ती खूप बोलते आणि गप्प बस असं तिला सांगावं लागतं असं म्हटलं आहे.

रितेशने केली तक्रार

फराहने मुलाखतीदरम्यान ‘लॉक अप सीझन २’बद्दल भाष्य केलं. यावेळी रितेशनेही त्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “सगळ्यात आधी मला इथे बोलावण्यासाठी धन्यवाद. प्राजक्ता तू म्हणालीस की फराह खूप गोड, चांगली आणि प्रेमळ आहे, पण तू तिच्याबरोबर काम केलंय का?”. प्राजक्ता यावर म्हणाली, “मी अजून तिच्याबरोबर काम नाही केलंय”. त्यावर रितेश म्हणाला, “मग जोवर तू तिच्याबरोबर काम करत नाही तोपर्यंत तू तुझं मत इतक्यात व्यक्त करू नकोस. एकदा तू तिच्याबरोबर काम केलंस की तुला बोलावं लागेल की फराह गप्प बस”.

रितेश पुढे ‘लॉक अप’बद्दल म्हणाला, “जसं की फराह म्हणाली, खूप वेगळा अनुभव राहिला आहे आणि खूप छान होता. ते काम नव्हतं तर आम्ही एकत्र खूप मज्जा केली. आम्ही जेव्हा शो करत होतो तेव्हा फक्त काय घडतंय एवढं महत्त्वाचं नव्हतं. त्याही पलीकडे आम्ही खूप शिकलो. फक्त मनोरंजनापूरता तो शो महत्त्वाचा नव्हता. माणसांच्या स्वभावाबद्दलही खूप काही शिकायला मिळालं. तर त्यात सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील घटना शेअर केल्या.”

रितेशने पुढे ‘लॉक अप सीझन २’च्या वेगळेपणाबद्दल सांगितलं. यावेळी त्याने या शोमुळे कसे वेगवेगळे विषय हाताळले गेले हेही अधोरेखित केलं.