Rohit Saraf Dating Rumours: अभिनेता रोहित सराफ नॅशनल क्रश म्हणून ओळखला जातो. ‘मिसमॅच्ड’ (Mismatched) या वेब सीरिजमुळे अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. प्राजक्ता कोळी व रोहित सराफ यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

अनेकदा रोहित सराफ कोणाला डेट करत आहे, अशा चर्चा रंगताना दिसतात. एका लोकप्रिय अभिनेत्रीचे रोहित सराफबरोबर नाव जोडले जात आहे. रोहित सराफ या अभिनेत्रीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. आता ही अभिनेत्री कोण आणि या चर्चा कशा सुरू झाल्या, याबद्दल जाणून घेऊ…

फिल्मफेअरच्या एका रिपोर्टनुसार, रोहित सराफ अभिनेत्री प्रतिभा रांटाला डेट करत आहे. लवकरच ते ‘द रिव्हॉल्यूशनरीज'(The Revolutionaries) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या शूटिंगदरम्यानच त्यांच्यात जवळीक वाढली.

Award Banner

मीडिया रिपोर्टनुसार, रोहित सराफ आणि प्रतिभा रांटा यांना इतक्यात त्यांच्या नात्याला कोणतेही नाव द्यायचे नाही. सध्या त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे. त्यांच्यात उत्तम मैत्री आहे, पण सध्या त्यांना या नात्याला कोणतेही लेबल द्यायचे नाही. आता रोहित व प्रतिभाच्या नात्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही कलाकारांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या नात्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होत आहे. गेल्या वर्षी द रिवोल्यूशनरीजचे निर्माते निखिल अडवाणी यांच्या दिवाळीच्या पार्टीत त्यांना एकत्र पाहिले गेले होते.

रोहित व प्रतिभा यांनी या पार्टीमध्ये एकमेकांच्या कपड्यांना मॅचिंग असे कपडे परिधान केले होते. तसेच, त्यांनी काही फोटोदेखील शेअर केले होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

प्रतिभा रांटा कोण आहे?

‘लापता लेडीज’ या सिनेमातून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. तसेच, त्याआधी ती कुरबान हुआ या मालिकेतूनही लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री २५ वर्षांची असून सध्या ती विविध भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता हे कलाकार रिलेशनशिपच्या चर्चांवर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, रोहित सराफने द स्काय इज पिंक, ‘इश्क विश्क रिबाउंड’, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ अशा अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.