scorecardresearch

Premium

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कार अन् घरातील महागड्या वस्तू विकल्या; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “अक्षय कुमार व अमिताभ बच्चन…”

“मी कोणावरही उपकार केले नाही, ती माझी जबाबदारी होती,” कार विकण्याबद्दल अभिनेत्याचे विधान

Ronit roy
अभिनेत्याने सांगितली करोना काळातील परिस्थिती

रोनित रॉय उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक सुरक्षा एजन्सी देखील चालवतो. करोना काळ त्याच्या व्यवसायासाठी खूप कठीण काळ होता, कारण त्याचे काम बंद झाले होते आणि त्याच्यावर १३० कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी होती. त्या काळात त्याचे सुरक्षारक्षक कामावर नसतानाही अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि करण जोहर यांनी सेवेचे पूर्ण पैसे दिले होते, असं रोनितने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

रोनितने २००० मध्ये ‘एसीई’ ही एजन्सी सुरू केली होती. आता रोनितची एजन्सी इंडस्ट्रीतील सर्व आघाडीच्या सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवते. ‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत रोनित म्हणाला, “करोनाची साथ येण्याच्या काही महिन्यांपूर्वी मी फारसं काम केलं नव्हतं. माझ्याकडे १३० लोक होते आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. आम्ही सर्वांचा पगार देण्याचं ठरवलं. त्यांचा पगार देताना मला समजलं की घरात खूप निरुपयोगी गोष्टी पडून आहेत. मी वापरत नसलेल्या कार होत्या, माझ्याकडे एक मिनी कूपर होती, जी मी कधीही चालवणार नाही हे मला माहीत होतं म्हणून मी ती विकली. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आम्ही इतरही अनेक लक्झरी वस्तू विकल्या. खरं तर मी कोणावरही उपकार केले नाही, ती माझी जबाबदारी होती.”

satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
central government stand sec 498a ipc for domestic violence in bombay hc
महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार
nirmala sitaraman
पंतप्रधान मोदी महिलांना गिफ्ट देण्याच्या तयारीत? महिलांना कर रचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता

प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

करोना काळात सेवा न पुरवताही पैसे देणाऱ्या सेलिब्रिटींची नावं रोनितने घेतली. “अक्षय कुमार, करण जोहर अमिताभ बच्चन सरांचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांनी सेवांशिवाय दिले. त्यांच्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला. १३० पैकी ३० जणांची काळजी त्यांनी घेतली होती,” असं रोनितने सांगितलं.

“तू असे सीन करायला नको होते…”, ‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट दृश्यांवर तृप्ती डिमरीच्या पालकांची प्रतिक्रिया; म्हणाली, “ते माझ्याशी…”

आमिर खान आणि करण जोहरने आपल्या वडिलांना गमावलं त्या काळात आपण त्यांच्यासोबत होतो, असा खुलासा मुलाखतीदरम्यान रोनितने केला. “मी आमिरबरोबर होतो, त्याला सुरक्षा देण्यासाठी मी ‘लगान’च्या सेटवर होतो. आम्ही मित्रही होतो, मला माहित आहे की तो माझ्यावर किती प्रेम करतो. करण माझा आवडता आहे. पण तो त्याच्या वडिलांइतका माझा आवडता कधीच नसेल. मला सुरुवातीच्या काळात ऋषी कपूर, रणधीर कपूर, यश जोहर यांच्याकडून खूप प्रेम मिळालं,” असं रोनित म्हणाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ronit roy sold car and luxury items for staff salary in corona pandemic akshay kumar amitabh bachchan helped hrc

First published on: 11-12-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×