scorecardresearch

Premium

शाहरुख खानच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटातून सचिन तेंडुलकर करणार होता बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण…

चित्रपटाची लांबी ही तब्बल पावणे चार तासांची असल्याने यातील काही सीन्स आणि काही भूमिका वगळण्यात आल्या. त्यापैकीच एक भूमिका सचिन तेंडुलकरची होती

shahrukh-khan-sachin-tendulkar
फोटो : जीक्यु / सोशल मीडिया पेज

सध्या बॉक्स ऑफिसवर एकच नाव गाजतंय ते म्हणजे शाहरुख खान. सध्या किंग खानचं नाणं बॉक्स ऑफिसवर खणखणीत वाजतंय. शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं असलं तरी एकेकाळी शाहरुखने बॉलिवूडवर एक हाती राज्य केलं आहे. आजही त्याचे कित्येक चित्रपट प्रेक्षक आवडीने पुन्हा पुन्हा पाहतात. यापैकीच एक जबरदस्त हीट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘मोहब्बतें’. हा चित्रपट येऊन २३ वर्षं उलटली असतील तरी आजही यातील गाणी अन् शाहरुख व बिग बी यांच्यातील शीतयुद्ध आजही सगळ्यांच्याच स्मरणात आहे.

याच चित्रपटाशी आपल्या क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं एक खास कनेक्शन आहे. त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. ‘यश राज फिल्म’च्या बॅनरखाली बनलेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांच्या करिअरची दुसरी इनिंगच होती. त्यावेळी शाहरुखची लोकप्रियता पाहून बरेच मतभेद असूनही बिग बी यांनी या चित्रपटासाठी यश चोप्रा यांना होकार दिला.

the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
shahid-kapoor-haider
‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने घेतलं नव्हतं मानधन; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने सांगितलं कारण
Abhishek
“अभिषेक बच्चनने मिरचीचा ठेचा भाजीसारखा खाल्ला आणि…”, सैयामी खेरने सांगितली पुण्यातील शूटिंगदरम्यानची आठवण
Jawan Movie
भारतीय सेनेच्या जवानांसाठी ‘जवान’ चित्रपटाचे स्पशेल स्क्रीनिंगचे आयोजन, दिग्दर्शक एटलीही हजर

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘डंकी’मध्ये भारत-कॅनडामधील तणावाचे संदर्भ असणार का? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

चित्रपटात शाहरुख आणि अमिताभ यांच्याबरोबरच ऐश्वर्या रायचीही प्रमुख भूमिका होती. ऐश्वर्या ही अमिताभ यांच्या मुलीच्या भूमिकेत होती. गमंतीची गोष्ट म्हणजे या कथेत अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा एक मुलगाही असणार होता अन् त्यासाठी एक खास भूमिका लिहिलीसुद्धा होती. तुम्हाला ही गोष्ट वाचून कदाचित आश्चर्याचा धक्काच बसेल की अमिताभ यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी त्यावेळी यश चोप्रा यांनी सचिन तेंडुलकरला घ्यायचं नक्की केलं होतं.

अमिताभ यांच्या सावत्र मुलाच्या भूमिकेसाठी सचिन तेंडुलकरला साईन करण्यात आलं होतं, पण काही कारणास्तव नंतर हा भाग चित्रपटातून वगळण्यात आला. एवढंच नव्हे तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका श्रीदेवी यांना ऑफर झाली होती. चित्रपटाची लांबी ही तब्बल पावणे चार तासांची असल्याने यातील काही सीन्स आणि काही भूमिका वगळण्यात आल्या. त्यापैकीच एक भूमिका सचिन तेंडुलकरची होती. अर्थात तसं झालं नाही अन् सचिनची बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करायची संधी थोडक्यात हुकली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar was signed for shahrukh khan superhit film mohabbatein for this role avn

First published on: 02-10-2023 at 21:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×