बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील रावणाच्या लूकमुळे तो ट्रोल झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा सैफ अली खान हा ट्रोल झाला आहे. त्याला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.

सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत सैफ हा गाडीतून उतरताना दिसत आहे. यावेळी त्याने निळ्या रंगाचा टीशर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केली आहे. यावेळी सैफचा बदललेला लूक, स्टाईल पाहून सर्वांना धक्का बसला. तसेच त्याची चालण्याची स्टाईलमुळेही त्याला ट्रोल केले जात आहे.
आणखी वाचा : Video : लेक आराध्याचे विस्कटलेले केस पाहून ऐश्वर्याने केलं असं काही…

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
IPL 2024 to Introduce Smart Replay System
IPL 2024 मध्ये स्मार्ट रिप्ले सिस्टीम आणण्याच्या तयारीत, वाचा काय आहेत फायदे

यावरुन सैफ हा चांगलाच ट्रोल झाला आहे. “हा घरी बसून बसून जाड झाला आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने यावर केली आहे. तर एका नेटकऱ्याने याची तुलना मलायका अरोराशी केली आहे. “हा मलायकासारखा का चालतोय”, अशी कमेंट एकाने केली आहे. एकाने “हा बॉडी का बनवत नाही”, अशी कमेट केली आहे.

आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात दीपिका पदुकोणचा शाही थाट, साडीची किंमत माहीत आहे का? 

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटावरुन वाद झाला होता. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्स, हनुमान आणि रावणाचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होताना दिसत आहे. खास करून सैफने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेचा लूक कोणालाच आवडलेला नाही. त्यावरून बराच वाद सुरू आहे.