Saif Ali Khan Insurance Claim Document : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला. दरोडेखोराने अभिनेत्यावर तब्बल ६ वार केले होते. यानंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडियावर सैफ अली खानचं रुग्णालयाचं बिल किती झालं? याची प्रत व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याला डिस्चार्ज कधी देण्यात येईल याची तारीख सुद्धा नमूद करण्यात आली आहे.

सैफच्या आरोग्य विम्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सैफकडून ३५ लाख ९८ हजार रुपयांचा आरोग्य विमा दाखल करण्यात आला होता. यापैकी कंपनीने २५ लाख मंजूर केले आहेत. याबद्दल निवा हेल्थ इन्शुरन्सने, संपूर्ण उपचारानंतर अंतिम बिल सादर झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल असं म्हटलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
Saif ali khan
सैफ अली खानला मुंबईच्या जुहूमध्ये घ्यायचं होतं हक्काचं घर, पण….; अनुभव सांगत म्हणालेला, “इथे मुस्लीम…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Saif Ali Khan Case
Saif Ali Khan Case : “भक्कम पुरावे…”, सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांची मोठी माहिती; आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबतही केला खुलासा
Saif Ali Khan attack case Mental health Titwala suspect
Video : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडलेल्या टिटवाळ्यातील संशयित तरूणाच्या मनावर परिणाम? कुटुंबीयांची खंत
Saif ali khan medicl clm
Saif Ali Khan : सैफला उपचारांसाठी ४ तासांत २५ लाखांची मंजुरी कशी मिळाली? विमा कंपनीच्या तत्परतेमुळे चर्चांना उधाण; AMC कडून तक्रार

सैफला डिस्चार्ज केव्हा मिळणार?

सैफच्या आरोग्य विम्याच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उपचार खर्च आणि त्याच्या संभाव्य डिस्चार्ज तारखेची माहिती उघड करण्यात आली आहे. अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात एका सूटमध्ये उपचार सुरू आहेत आणि २१ जानेवारी २०२५ रोजी त्याला डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. असं या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

इंडिया टुडेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सैफची प्रकृती उत्तम असेल तर त्याला कदाचित २० जानेवारी सुद्धा डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान, सैफच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सध्या तपासणी सुरू असताना वैद्यकीय पथकाला कोणतेही अधिक अपडेट्स शेअर न करण्याची विनंती केली आहे.

निवा बुपा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “अभिनेता सैफ अली खानबरोबर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही त्याची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी शुभेच्छा देत आहोत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आम्हाला कॅशलेस प्री-ऑथोरायझेशनची विनंती पाठवण्यात आली होती आणि उपचार सुरू करण्यासाठी आम्ही सुरुवातीच्या रकमेची मंजुरी दिली आहे. पूर्ण उपचारानंतर अंतिम बिल मिळाल्यानंतर, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार उर्वरित रक्कम दिली जाईल.”

दरम्यान, सैफ अली खानच्या आरोपीला तीन दिवसांनी ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीला न्यायलयात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल असं पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे.

Story img Loader