बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान अलिकडे अभिनेता हृतिक रोशनसह ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता. ३० सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सैफने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरूष’चा टीझर प्रदर्शित झाला. ज्यात तो रावणाची भूमिका साकारत आहे. मात्र या चित्रपटातील त्याच्या लूकवरून सध्या सोशल मीडियावर बरीच टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावर युजर्सच नाही तर अनेक कलाकारांनी या रावणाच्या या लूकला विरोध केला आहे. अशातच आता एका मुलाखतीत सैफ अली खानने त्याच्या ड्रीम रोलबाबत बोलताना ‘महाभारत’मध्ये अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानला त्याच्या ड्रीम रोलबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने ‘महाभारत’मध्ये अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली. जर महाभारताची निर्मिती कोणी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’सारखी करणार असेल तर मला महाभारतात अभिनय करायला आवडेल असं तो यावेळी म्हणाला.
आणखी वाचा- “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

या मुलाखतीत आपल्या ड्रीम रोलबाबत बोलताना सैफ म्हणाला, “मी माझ्या ड्रीम रोलबाबत कधी फारसा विचार केलेला नाही. जी भूमिका मला ऑफर केली जाते. त्याच भूमिकेबाबत मी विचार करतो. खरं सांगू तर माझा कोणताही ड्रीम रोल नाहीये आणि याचा विचार करण्यात काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण तरीही मला जे करायची इच्छा आहे ते म्हणजे, जर कोणी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’प्रमाणे बनवणार असेल तर मला महाभारतात अभिनय करायचा आहे.”

याच मुलाखतीत सैफ अली खानने याबाबत अजय देवगणसह काम करत असल्याचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार सैफ पुढे म्हणाला, “आम्ही अजय देवगणसह यावर काम करत आहोत. आमच्या पीढीच्या लोकांसाठी महाभारतातील भूमिका साकारणं आहे स्वप्नवत विषय आहे. जर शक्य झालं तर आम्ही यासाठी दाक्षिणात्य कलाकारांनाही या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेऊ. या सगळ्यात मला कर्णाची व्यक्तिरेखा खूपच आकर्षक वाटते. याशिवाय महाभारतात बऱ्याच उत्तम व्यक्तिरेखा आहेत.”

आणखी वाचा- ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स, हनुमान आणि रावणाचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होताना दिसत आहे. खास करून सैफने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेचा लूक कोणालाच आवडलेला नाही. त्यावरून बराच वाद सुरू आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.