प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रभासची भगवान रामची भूमिका तसेच सैफ अली खान साकारत असलेली रावण या भूमिकेला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. इतकंच नव्हे तर राजकीय क्षेत्रामधील मंडळीदेखील या चित्रपटावर आक्षेप घेत आहेत. शिवाय ‘आदिपुरुष’चा टीझर प्रजर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या व्हिएफएक्सबाबतही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. आता चित्रपटाचे दिग्दर्शक सीन्समध्ये काही बदल करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आणखी वाचा – Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

भगवान राम यांच्या भूमिकेमध्ये प्रभास शोभून दिसत नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर सैफ साकारत असलेल्या रावण या भूमिकेकडेही सिनेरसिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटामध्ये निर्माते-दिग्दर्शक काही बदल करणार का? याबाबत माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपट व्हिएफएक्समुळे बराच ट्रोल होत आहे. पण असं असलं तरी निर्माते-दिग्दर्शक यामध्ये कोणतेच बदल करणार नाहीत. ‘आदिपुरुष’चा थ्रीडीमध्येही टीझर प्रदर्शित करण्यात आला. थ्रीडी टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये बदल न करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे.

आणखी वाचा – ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन

प्रसारमाध्यमांसाठी ‘आदिपुरुष’च्या थ्रीडी टीझरचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी दिग्दर्शक ओम राऊतही उपस्थित होता. ओमने स्क्रिनिंगदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चित्रपटाच्या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं. तसेच चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी प्रेक्षक अधिक घाई करत असल्याचं ओमचं मत आहे.