‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी आल्यानंतर व्हिएफएक्समध्ये बदल होणार? निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला 'हा' निर्णय | saif ali khan prabhas adipurush movie after film gets trolled makers change vfx see details | Loksatta

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी आल्यानंतर व्हिएफएक्समध्ये बदल होणार? निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला ‘हा’ निर्णय

‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या नकारात्मक चर्चेत आहे. यादरम्यान चित्रपटामधील काही सीन्स बदलण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी आल्यानंतर व्हिएफएक्समध्ये बदल होणार? निर्माते-दिग्दर्शकांनी घेतला ‘हा’ निर्णय
‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या नकारात्मक चर्चेत आहे. यादरम्यान चित्रपटामधील काही सीन्स बदलण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रभासची भगवान रामची भूमिका तसेच सैफ अली खान साकारत असलेली रावण या भूमिकेला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. इतकंच नव्हे तर राजकीय क्षेत्रामधील मंडळीदेखील या चित्रपटावर आक्षेप घेत आहेत. शिवाय ‘आदिपुरुष’चा टीझर प्रजर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या व्हिएफएक्सबाबतही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. आता चित्रपटाचे दिग्दर्शक सीन्समध्ये काही बदल करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आणखी वाचा – Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

भगवान राम यांच्या भूमिकेमध्ये प्रभास शोभून दिसत नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर सैफ साकारत असलेल्या रावण या भूमिकेकडेही सिनेरसिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटामध्ये निर्माते-दिग्दर्शक काही बदल करणार का? याबाबत माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपट व्हिएफएक्समुळे बराच ट्रोल होत आहे. पण असं असलं तरी निर्माते-दिग्दर्शक यामध्ये कोणतेच बदल करणार नाहीत. ‘आदिपुरुष’चा थ्रीडीमध्येही टीझर प्रदर्शित करण्यात आला. थ्रीडी टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये बदल न करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे.

आणखी वाचा – ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन

प्रसारमाध्यमांसाठी ‘आदिपुरुष’च्या थ्रीडी टीझरचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी दिग्दर्शक ओम राऊतही उपस्थित होता. ओमने स्क्रिनिंगदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चित्रपटाच्या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं. तसेच चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी प्रेक्षक अधिक घाई करत असल्याचं ओमचं मत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हृदयविकाराचा झटका आला असल्याच्या अफवांवर अखेर उदित नारायण यांनी सोडलं मौन, म्हणाले, “खूप त्रास…”

संबंधित बातम्या

“माझा फोन घेतला, पालकांना मारण्याची धमकी दिली अन् चेहऱ्यावर…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला घरगुती हिंसाचाराचा खुलासा
“दबंग’च्या प्रदर्शनानंतर अरबाज…” मलायकाने सांगितलं घटस्फोट होण्यामागचं खरं कारण
अंगभर कपडे घालूनही मलायका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले “अगं थोडी लाज बाळग…”
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
“जगणंही कठीण झालं होतं कारण…” आमिर खानने सांगितला ‘तो’ प्रसंग, अभियक्षेत्रातील करिअरबाबतही केलं भाष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
‘प्रत्येकाची बुद्धी असते, कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्षपणे टोला
हम साथ साथ है! शस्त्रक्रिया होताना लालू प्रसादांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, मुलीने केली किडनी दान
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
परेश रावल यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कलमांखाली गुन्हा दाखल