scorecardresearch

‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”

‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांवर दिग्दर्शक ओम राऊतने सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”
'आदिपुरुष' चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांवर दिग्दर्शक ओम राऊतने सडेतोड उत्तर दिलं आहे.

प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉयकॉट आदिपुरुष’ हा ट्रेंड ट्विटरवर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच सैफ, प्रभासची या चित्रपटामधील भूमिका प्रेक्षकांना फारशी पटली नाही. रावणाच्या भूमिकेमधील सैफला तर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. चित्रपटाबाबत होणाऱ्या चर्चांवर आता ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतने स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – ट्रोलिंग, नकारात्मक चर्चा अन्…; प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉट करण्याची मागणी

दिग्दर्शक ओम राऊत काय म्हणाला?
प्रसारमाध्यमांसाठी ‘आदिपुरुष’च्या थ्रीडी टीझरचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी दिग्दर्शक ओम राऊतही उपस्थित होता. ओमने स्क्रिनिंगदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चित्रपटाच्या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं. तसेच चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी प्रेक्षक अधिक घाई करत असल्याचं ओमचं मत आहे.

‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? असा प्रश्न ओम राऊतला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “लोक ज्याप्रकारे या चित्रपटाबाबत व्यक्त होत आहेत याबाबत मला कोणतंच आश्चर्य वाटत नाही. याउलट मला या गोष्टीचं वाईट वाटलं. रुपेरी पडद्याचा विचार करूनच मी हा चित्रपट बनवला आहे. पण ट्रोलिंग किंवा नकारात्मक चर्चा मी थांबवू शकत नाही. मोबाईवर पाहण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आलेला नाही. युट्यूबवर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित न करण्याचा पर्याय माझ्याकडे असता तर आज ‘आदिपुरुष’चा टीझर तिथे प्रदर्शित झालाच नसता. पण सध्या युट्यूब म्हणजे काळाची गरज आहे.”

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या घराची सफर, अभिनेत्रीने आपल्या हक्काच्या घराची केली सुंदर सजावट

तो पुढे म्हणाला, “आजच्या पिढीतील मुलांना रामायणाबाबत फारसं माहित नाही. म्हणूनच रामायणावर आधारित आम्ही हा चित्रपट बनवला आहे. जेणेकरून प्रत्येक पिढीतील सिनेरसिकांना याबाबत माहिती मिळेल. तसेच हा काही एनिमेशन चित्रपट नाही. लाइव्ह एक्शन सीन्स या चित्रपटासाठी चित्रित करण्यात आले आहेत. कॅप्चर तंत्रज्ञानाचा आम्ही चित्रपटासाठी वापर केला नाही.” ओम राऊत यांनी सतत होणाऱ्या चित्रपटाच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं असल्याचं यामधून स्पष्ट होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या