प्रभास, सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’बाबत विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तर टीझर पाहून चित्रपटामधील कलाकारांच्या लूकची खिल्ली उडवली. आता ‘बॉयकॉट आदिपुरष’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. तसेच चित्रपटाच्या व्हिएफएक्सबाबतही नेटकरी टीका करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा चित्रपट बिग बजेट असल्याचं बोललं जात आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासून बरीच उत्सुकता होती. पण प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ नकारात्मक चर्चेत आला आहे. सैफ या चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या फारशी पसंतीस पडली नाही.

हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटांची कॉपी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर काहींनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ पाहून हा चित्रपट तयार केला का? असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. प्रभास-सैफचे या चित्रपटामधील सीन्स हॉलिवूडचे चित्रपट पाहूनच चित्रीत केले असल्याचं नेटकरी सतत ट्विटच्या माध्यमातून म्हणत आहेत.

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या घराची सफर, अभिनेत्रीने आपल्या हक्काच्या घराची केली सुंदर सजावट

‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. पण आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. फक्त रावणच नव्हे तर हनुमानची भूमिकाही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे असा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे. क्रिती सेनॉनही ‘आदिपुरुष’मध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. पुढील वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan prabhas movie adipurush boycott trends on twitter actors trolled for film character see details kmd
First published on: 04-10-2022 at 17:16 IST