Taimur complains TO Dad Saif Ali Khan: सैफ अली खान त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या मुलांमुळेदेखील चर्चेत असतो. सारा अली खान, इब्राहिम अली खान, तैमूर व जेह ही त्याची मुले सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सारा व इब्राहिम सध्या बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. तर तैमूर फक्त ९ वर्षांचा आहे. मात्र, तरीदेखील त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसते. तो आई-वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार का, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. मात्र, तैमूरला संवाद पाठ करण्यात रस नसल्याचे सैफ अली खानने एका मुलाखतीत उघड केले.
तैमूरने सैफ अली खानकडे केलेली तक्रार
सैफ अली खानने नुकतात जयदीप अहलावतशी संवाद साधला. त्यावेळी अभिनेत्याने तैमूरबाबत वक्तव्य केले. हा व्हिडीओ नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सैफ अली खान म्हणाला, “तैमूरने शाळेतील नाटकात भाग घेतला होता. तो मला म्हणाला की, मला लोकांची खूप भीती वाटते. मला तिथे डायलॉग्ज म्हणायचे नाहीत. तुम्ही कितीतरी ओळी एकदम बोलता, तुम्ही उत्तम आहात. मला माहीत नाही की, तुम्ही कसे शिकलात. असे म्हणत लोकांसमोर जाऊन संवाद म्हणण्याची भीती वाटत असल्याचे तैमूरने सांगितले होते, असा खुलासा सैफ अली खानने केला.
कलाकारांची मुले म्हणून जी प्रसिद्धी तैमूरला मिळते, त्याला तो कसा सामोरा जातो, या प्रश्नाचे उत्तर देताना सैफ अली खान म्हणाला, “मला वाटते की, त्याला या सगळ्याची आता सवय झाली आहे. मला आशा आहे की, त्याला याची जाणीव होईल की, आपण सामान्य लोक आहोत.
पुढे आई-वडिलांबद्दल म्हणजे मन्सूर अली खान पतौडी आणि आई शर्मिला टागोर यांच्याबद्दल सैफ अली खान म्हणाला, “माझे आई-वडील दोघेही स्टार होते. मात्र, घरी ते साधेपणाने राहत. ते कडक शिस्तीचे होते.”
याच मुलाखतीत त्याने असेही सांगितले की, मी नुकताच तैमूरला आदिपुरुष हा चित्रपट दाखवला. काही वेळानंतर तो माझ्याकडे पाहू लागला. त्यानंतर मी त्याची माफी मागितली. त्याने मला माफ केले, असे हसत सैफ अली खान म्हणाला.
दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये सैफ अली खानवर त्याच्याच घरात एका अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केला होता. त्यावेळी जखमी सैफ अली खानबरोबर तैमूर रुग्णालयात गेला होता. तैमूर व जेह ही सैफ अली खान व करीना कपूर यांची मुले आहेत.