‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या शोचा पहिला ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये कोणते कलाकार कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत हे पाहायला मिळत आहे. आलिया भट्ट, करण जोहर, ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान, जान्हवी कपूर, रोहित शर्मा असे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक हजेरी लावणार असल्याचे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. याबरोबरच रोहित शर्मानेदेखील हजेरी लावल्याचे दिसत आहे.

काय म्हणाला सैफ अली खान?

विनोदाने परिपूर्ण ट्रेलर असून कपिल शर्मा आणि कार्यक्रमात हजेरी लावलेले पाहुणे पोट धरून हसताना दिसत आहेत. या ट्रेलरच्या शेवटी कपिल शर्मा सैफ अली खानबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. तो म्हणतो, “याआधी आमिर खानने या शोमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी त्याने सांगितले होते की त्याची मुलं त्याचं ऐकत नाहीत. आता मला वाटत आहे की तुमचा मुलगा इब्राहिम आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तयार आहे, तो तुमचं ऐकतो का?” यावर उत्तर देताना सैफ अली खानने म्हटले, “मला वाटते त्याने आमिर खानचे ऐकले पाहिजे. करिअर बाबतीत त्याने आमिरचा सल्ला घेतला पाहिजे.”

govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
why saif ali khan grandfather built Pataudi Palace
८०० कोटींचा पतौडी पॅलेस रंगवण्याऐवजी सैफ अली खानने लावला चुना; सोहा अली खान म्हणाली, “आजोबांचे पैसे…”
Vivek Oberoi on akshay kumar fitness routine
“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा
kareena kapoor praises shahid kapoor
ब्रेकअपनंतर तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदाच करीना कपूरने मानले शाहिद कपूरचे आभार; म्हणाली, “त्याच्याशिवाय…”
Vivek Oberoi shifted to Dubai
तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

सैफ अली खानने अभिनेत्री अमृता सिंगबरोबर पहिले लग्न केले होते. १९९१ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. मात्र, २००४ मध्ये घटस्फोट घेत हे जोडपं वेगळं झालं. त्यानंतर २०१२ मध्ये अभिनेत्याने करिना कपूर बरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत. इब्राहिम आणि सारा दोघेही आपल्या वडिलांबरोबर अनेकदा दिसतात. अनेकदा संपूर्ण कुटुंब एकत्र वेळ घालवताना सोशल मीडियावर पाहायला मिळते. आता सैफ अली खानचा मुलगा अभिनय क्षेत्रात कोणत्या चित्रपटातून पदार्पण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: “मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

दरम्यान, द कपिल शर्मा शो २१ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच टीमने टीझर प्रदर्शित केला होता. त्यामध्ये सगळे शनिवार विनोदामध्ये बदलतील असे म्हटले होते. या पर्वात कपिल शर्माबरोबरच किकू शारदा, सुनील ग्रोवर, राजीव ठाकूर आणि अर्चना सिंग हे कलाकार दिसणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही नवीन पात्रे यामध्ये दिसणार आहेत.

द कपिल शर्माचे पहिले पर्व मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि जूनमध्ये समाप्त झाले होते. पहिल्या सीझनमध्ये नीतू कपूर, रणबीर कपूर, राजकुमार राव, सनी देओल, बॉबी देओल, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन, हिरामंडी या वेबसीरिजची संपूर्ण टीम आणि अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता नव्या पर्वात काय नवीन पाहायला मिळणार, प्रेक्षकांना हे पर्व आवडणार का, त्यांचा कसा प्रतिसाद असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.