scorecardresearch

Premium

“मी कात्री घेतली अन्…”, दिलीप कुमार व वैजयंतीमालांचा ‘तो’ फोटो पाहून सायरा बानोंनी केलं असं काही की… स्वतःच केला खुलासा

“ते खूप हँडसम होते, मी त्यांच्यासाठी वेडी होते”, सायरा बानोंची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

Saira Banu Was Feeling Jealous After Seeing Dilip Kumar And Vyjayanthimala Photo
सायरा बानोंनी सांगितला जुना किस्सा, फोटो शेअर करत म्हणाल्या…

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो इन्स्टाग्रामवर सक्रिय झाल्या आहेत. त्या त्यांच्या अकाउंटवर अनके जुने किस्से शेअर करत असतात. नुकताच त्यांनी दिलीप कुमार व वैजयंतीमाला यांच्या फोटोबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. आपल्याला वैजयंतीमालांचा दिलीप कुमार यांच्याबरोबरचा फोटो पाहून मत्सर वाटला होता, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शूटिंग करताना दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही किस करत होते ‘हे’ बॉलीवूड कलाकार, पाहा Photos

pimpri Criminals pistols
पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; दरोडा विरोधी पथकाची कारवाई
liquor bottles Subhash Chandra Bose memorial nagpur municipal corporation marathi news
नागपुरात सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाजवळ मद्याच्या रिकाम्या बाटल्या! विविध संघटनांकडून संताप व्यक्त
kangana Ranaut Met Bageshwar Baba
अयोध्येत कंगनाने घेतली बागेश्वर बाबांची भेट, म्हणाली, ” मी त्यांना मिठीच मारणार होते, पण…”
Rahul Gandhi Assam Bharat Jodo Yatra INC
VIDEO : भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधी थेट विरोधकांसमोर उभे ठाकले अन्…, ‘त्या’ कृतीनं वेधलं सर्वांचं लक्ष

७९ वर्षीय सायरा बानो यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “बऱ्याचदा बालपण आणि तारुण्याच्या आठवणी खूप विचित्र, मजेदार असू शकतात. ही माझ्यासाठी १९५८ ची खास आठवण आहे, जेव्हा मी लहान होते. खरं तर गेल्या काही वर्षांत माझी आवडती फिल्म स्टार वैजयंतीमाला यांच्याशी माझं नातं चांगलं झालं आहे. त्या आता माझ्या ‘अक्का’ (मोठी बहीण) आहे. आम्ही दर आठवड्याला एकमेकींशी बोलतो.”

“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

सायरा बानो पुढे म्हणाल्या, “जशीजशी मी मोठी होत होते, मला माझ्या पलंगाच्या अगदी शेजारी भिंतीवर माझ्या आवडत्या हार्टथ्रॉबचे फोटो चिकटवायची सवय होती, जेणेकरून मी उठल्यावर ते माझ्या नजरेस पडतील. एक वर्षापूर्वी लंडनमध्ये खास प्रदर्शित झालेल्या ‘शान’मध्ये मी साहबचा (दिलीप कुमार) दमदार अभिनय पाहिला होता. ते खूप हँडसम होते, मी त्यांच्यासाठी वेडी होते. त्यानंतर ‘द किंग ऑफ रॉक’ एल्विस प्रेस्ली, रॉक हडसन आणि जेम्स डीन यांचे कटआउट्सही भिंतीवर मी चिकटवले होते.”

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

“माझ्या आईला माहीत होतं की मला भारतीय चित्रपटांचे वेड आहे, म्हणून ती आमच्या मनोरंजनासाठी वेळोवेळी फिल्मफेअर मासिक पोस्ट करत असे. मासिक कोण आधी उचलणार याबाबत माझं आणि माझ्या भावाचं कायम भांडण व्हायचं. अशाच एका मासिकात त्याकाळी खूप बोल्ड समजल्या जाणाऱ्या ‘मधुमती’चा हा फोटो होता, ज्यात साहेब रोमँटिक स्टाईलमध्ये वैजयंतीमालाच्या कपाळावर त्यांचा चेहरा ठेवून होते,” असं त्या सांगतात.

“तो एक सुंदर फोटो होता आणि माझ्या लहानपणी वैजयंतीमालांना साहेबांच्या चेहऱ्याजवळ पाहून मला इतका मत्सर वाटला की मी कात्री घेतली आणि तो फोटो कापू लागले. आता जेव्हा मला ते आठवतं तेव्हा मी हसते. तोपर्यंत मी त्यांना कधीही चित्रपटात पाहिलं नव्हतं. नंतर नशिबाने मला त्या माझ्या कुटुंबातील सदस्यासारख्या झाल्या. त्यांच्यासोबत माझ्या अनेक रंजक आठवणी आहेत. मी ‘अक्का’चा खूप आदर करतो आणि एक दिवस मी त्यांना याबाबत सांगेन,” असं त्यांनी लिहिलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saira banu felt jealous when she saw dilip kumar and vyjayanthimala close photo reveals on instagram hrc

First published on: 13-09-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×