scorecardresearch

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच साजिद खानने केली नव्या चित्रपटाची घोषणा

साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील वादग्रस्त सदस्यांपैकी एक ठरला. आता नुकताच तो ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाला असून लगेचच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल भाष्य केलं.

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच साजिद खानने केली नव्या चित्रपटाची घोषणा

साजिद खान ‘बिग बॉस १६’ मधील वादग्रस्त सदस्यांपैकी एक ठरला. तो ‘बिग बॉस १६’मध्ये आपल्यापासून अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले. ‘बिग बॉस’मध्ये त्याचे येणं हे अनेकांना आवडलं नाही. सुरुवातीपासूनच त्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली जात होती. आता नुकताच तो ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाला असून लगेचच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल भाष्य केलं.

साजिद खान सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत होता. शिव ठाकरे, निम्रत, एमसी स्टॅन, अब्दू रोझिक आणि सुंबूल तौकीर खान यांच्याबरोबर मिळून तो बिग बॉसचा गेम खेळत होता. गेली अनेक वर्ष प्रसिद्धीपासून दूर असलेला साजिद खान ‘बिग बॉस १६’मध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला होता. मध्यंतरीच्या काळात त्याच्यावर अनेकींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यामुळे त्याला काम मिळणं ही बंद झालं होतं. पण आता तो एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’चा जगभर बोलबाला, परदेशातील ॲडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत केली कोट्यवधींची कमाई

साजिद खान नुकताच बिग बॉस मधून बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत त्याच्याबद्दल भाष्य केलं. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे 100%. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं त्याने जाहीर केलं. हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार आणि यात कोण कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाच्या कारणामुळेच त्याने बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा : “प्रत्येकाला एक…” करणवीर बोहरा आणि पूनम पांडेचा साजिद खानला पाठिंबा

साजिद खानची बिग बॉसमध्ये झालेली एन्ट्री यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक जण त्याच्या विरोधात बोलत होते. आता बिग बॉसमधून बाहेर पडताना त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतोय तो प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या