Salim Javed : सलीम-जावेद ( Salim Javed ) म्हणेज हिंदी सिनेसृष्टीतली अशी जोडी ज्यांच्या नावावर २२ हिट चित्रपट आहेत. शोले, दीवार, जंजीर इथपसून ते शक्ती सिनेमापर्यंत दोघं एकत्र होते. या दोघांच्या यशाची कहाणी सांगणारी डॉक्युमेंट्री ‘अँग्री यंग मेन’ ही अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी जावेद अख्तर यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं. लवकरच सलीम जावेद ( Salim Javed ) लिखित एक चित्रपट आम्ही असं त्यांनी सांगितलं आहे.

सलीम-जावेद यांनी घडवला इतिहास

सलीम खान आणि जावेद अख्तर ( Salim Javed ) या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण केला. त्यांनी चित्रपट क्षेत्रात केलेली सुरूवात, पटकथा लेखनाची मिळालेली संधी आणि मग ‘हाथी मेरे साथी’पासून दोघांचा सुरू झालेला एकत्र प्रवास, एकापाठोपाठ एक लोकप्रिय चित्रपटांचे कथालेखन, पुढे यशोशिखरावर पोहोचल्यानंतर या दोघांमध्ये आलेला दुरावा हा सगळा रंजक प्रवास उलगडणाऱ्या ‘अँग्री यंग मेन’ या माहितीपटाची निर्मिती सलीम खान यांचा मुलगा अभिनेता सलमान खान आणि जावेद अख्तर यांची दोन्ही मुले अभिनेता-दिग्दर्शक फरहान व दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मिळून केली आहे. नम्रता राव यांनी दिग्दर्शित केलेल्या माहितीपटाच्या झलक अनावरण सोहळ्याला सलीम खान आणि जावेद अख्तर दोघेही आपल्या मुलांसह, कुटुंबियांसह उपस्थित होते.

हे पण वाचा- बॉलीवूडची लोकप्रिय पटकथाकार जोडी सलीम – जावेद पुन्हा एकत्र येणार

जावेद अख्तर काय म्हणाले?

सत्तरच्या दशकांत ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’सारखे एकापाठोपाठ एक सुपरहिट हिंदी चित्रपट लिहिणारी सलीम – जावेद ( Salim Javed ) ही पटकथाकार जोडी खूप वर्षांनी मंगळवारी एकत्र आली. एकेकाळी पटकथाकार म्हणून चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या जोडीच्या वैभवी कारकिर्दीचा इतिहास ‘अँग्री यंग मेन’ या तीन भागांच्या माहितीपटातून उलगडणार आहे. या माहितपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या निमित्ताने सलीम खान आणि जावेद अख्तर ( Salim Javed ) एकत्र आले. एवढंच नाही तर लवकरच एका नव्या चित्रपटासाठी एकत्र कथालेखन करणार असल्याचेही यावेळी जावेद अख्तर यांनी जाहीर केलं.

आत्तापर्यंत गुलदस्त्यात असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार?

हाथी मेरे साथी, शोले, जंजीर, डॉन, सीता और गीता या आणि अशा एकाहून एक सरस चित्रपटांसाठी सलीम जावेद या जोडीने काम केलं आहे. हिंदी सिनेसृष्टी बॉलिवूड होण्यापूर्वीचा इतिहास सलीम-जावेद या नावांशिवाय अपूर्ण आहे. या जोडीचा येणारा आगामी चित्रपट कुठला? या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सलीम-जावेद ( Salim Javed ) यांच्यावर आधारित अँग्री यंग मेन या डॉक्युमेंट्रीतून मिळू शकतात. २० ऑगस्टला ही डॉक्युमेंट्री रिलिज होणार आहे.