सध्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतं आहे. प्रेक्षकांचा 'जवान'ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बरेच रेकॉर्ड मोडून नवनवीन रेकॉर्ड या चित्रपटाने निर्माण केले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन १८ दिवस पूर्ण झाले असली तरी अजूनही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अशातच आता सलमान खान देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. हेही वाचा - “…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”; उत्कर्ष शिंदेच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाला… काही महिन्यांपूर्वी सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही जास्त चालला नाही. आता लवकरच सलमानचा बुहुप्रतिक्षित 'टायगर ३' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. https://www.instagram.com/p/CwrYFvIIuNg/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading हेही वाचा – Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क 'टायगर'चे निर्माते आदित्य चोप्रा २७ सप्टेंबरला म्हणजेच 'यश राज फिल्म्स'चा स्थापना दिवस आणि चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या जन्मदिना दिवशी 'टायगर्स स्पेशल मेसेज' दाखवणार आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वीची पूर्वकल्पना असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर चित्रपटाचं प्रमोशन सुरू होईल असं म्हटलं जात आहे. हेही वाचा- Rahul Vaidya And Disha Parmar: लक्ष्मी आली घरी! राहुल वैद्यच्या आई-वडिलांनी नातीचं केलं असं स्वागत; पाहा व्हिडीओ 'टायगर्स स्पेशल मेसेज' हा सलमान देणार आहे. एका व्हिडीओत सलमान एजेंट टायगरच्या रुपात महत्त्वपूर्ण मेसेज देताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे. हा एक चित्रपटाचा प्रिव्ह्यू किंवा टीझर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण बऱ्याच काळापासून प्रेक्षक या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. हेही वाचा – ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा जबरदस्त प्रोमो दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'टायगर ३' चा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सलमान आणि कतरिना कैफचा जबरदस्त अंदाजात पाहायला मिळाले होते. 'टायगर ३' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.