बॉलीवूडमध्ये असे कलाकार आहेत, ज्यांच्यावर चाहते वर्षानुवर्षे प्रेम करताना दिसतात. याबरोबरच, काही ऑनस्क्रीन जोड्यादेखील प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. या कलाकारांपैकी एक जोडी म्हणजे सलमान खान आणि संजय दत्त यांची आहे. 'साजन', 'चल मेरे भाई' अशा चित्रपटांत एकत्र काम करणाऱ्या दोन अभिनेत्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता अनेक वर्षांनंतर ते एकत्र दिसणार असल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. इंडो-कॅनॅडियन गायक ए. पी. ढिल्लनच्या 'ओल्ड मनी' (Old Money) या म्युझिक प्रोजेक्टमध्ये ते एकत्र दिसणार आहेत. गायक ए. पी. ढिल्लनने शुक्रवारी या आगामी प्रोजेक्टचा एक टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रदर्शित करताना संजय दत्त, सलमान खान आणि रॅपर-गीत लेखक शिंदा काहलॉन यांना टॅग करत लिहिले, "तुम्हाला माझी आठवण आली? मला माहीत आहे की, तुम्ही हे पाहिले नाही…" प्रदर्शित केलेल्या मोशन आर्ट व्हिडीओमध्ये सलमान खान, संजय दत्त आणि ए. पी. ढिल्लन दिसत आहे. हेही वाचा: Video : “लपून छपून तुमचा खेळ…”, रितेश देशमुखने निक्कीनंतर पंढरीनाथला झापलं, नेटकरी म्हणाले, “भाऊ कडक…” अभिनेता सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, "ए. पी, गायक चांगला होता, आता अभिनेतादेखील आहे." सलमान खानने शेअर केलेल्या स्टोरीनंतर एपी, सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबरोबर या प्रोजेक्टमध्ये अभिनय करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबरोबरच संजय दत्तनेदेखील ए. पी. ढिल्लनच्या पोस्टवर कमेंट करत 'ब्रदर्स' असे लिहिले आहे. https://www.instagram.com/reel/C-LChMkpzbs/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, ए. पी. ढिल्लनने संजय दत्त आणि सलमान खान यांच्याबरोबरच्या प्रदर्शित केलेल्या टीझरची सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना दिसत आहे. आता गाण्याबरोबरच, ए पी ढिल्लनचा अभिनयाचीदेखील प्रेक्षकांना भूरळ पडणार का?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता अनेक वर्षानंतर संजय दत्त आणि सलमान खान यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता ते पुन्हा एकदा कमाल करणार का?हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.