सलमान आणि शाहरुख लवकरच येणार आमने सामने; बॉलिवूडमध्ये रचला जाणार वेगळाच इतिहास

निर्माते आदित्य चोप्रा यांनी याबाबतीत प्रचंड गुप्तता राखली असल्याचं सांगितलं जात आहे

shahrukh salman next movie together
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ४ वर्षांनी ‘पठाण’ या चित्रपटातून पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला. भारतात ५०० कोटी तर जगभरात ९०० कोटीहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. शाहरुखच्या चाहत्यांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. याबरोबरच हा चित्रपट एवढा सुपरहीट होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे सलमान आणि शाहरुख या दोन सुपरस्टार्सचं एका चित्रपटात दिसणं. ‘पठाण’मधील सलमान खानचा कॅमिओ चांगलाच गाजला. खूप वर्षांनी प्रेक्षकांनी त्यांचे २ लाडके सुपरस्टार्स मोठ्या पडद्यावर एकत्र अॅक्शन करताना पाहिले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

आता पुन्हा या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. लवकरच चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचंही स्पष्ट झालं. ‘टायगर ३’ या सलमानच्या आगामी चित्रपटात सलमान आणि शाहरुख यांचा एक असाच धमाल सीन बघायला मिळणार आहे तसेच यासाठी एक भव्य आणि महागडा सेटदेखील लावला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता मात्र शाहरुख आणि सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर नागा चैतन्य करतोय ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला डेट; लंडनमधील व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

‘टायगर ३’नंतर सलमान आणि शाहरुख दोघेही एकाच चित्रपट झळकणार आहेत. लवकरच सलमान आणि शाहरुख ‘टायगर वर्सेज पठाण’ या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार या चित्रपटात शाहरुख आणि सलमान आमने सामने येणार आहेत. या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून यासाठी जबरदस्त पैसा खर्च केला जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

यशराज फिल्म्सच्याच स्पाय युनिव्हर्समध्येच हा चित्रपट येणार असून याची अत्यंत थाटात घोषणा यश राज फिल्म्स करणार आहेत. निर्माते आदित्य चोप्रा यांनी याबाबतीत प्रचंड गुप्तता राखली असल्याचं सांगितलं जात आहे. एका खात्रीशीर सूत्राच्या माहितीनुसार सलमान आणि शाहरुख दोघेही पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. ‘टाइगर वर्सेज पठान’ हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागडा आणि भव्य चित्रपट असणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 14:09 IST
Next Story
श्रीदेवी आणि बोनी कपूर तीन महिने एकमेकांशी बोलले नव्हते, कारण…
Exit mobile version