सलमान खानने चाहत्यांना ईदच्या निमित्ताने ‘ईदी’ दिली आहे. त्याने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली व सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा हा नवीन चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होईल, या चित्रपटाचं नावही ठरलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘गजनी’ फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक करणार आहे.

सलमान खानने त्याच्या खास शैलीत त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित केलं आहे, ज्यात त्याचं नाव लिहिलं आहे. ‘सिकंदर’ असं चित्रपटाचं नाव आहे. पोस्टमध्ये त्याने प्रेक्षकांना अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट पाहण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे.

“…मला माझ्या भारतीय वंशाची लाज वाटायची”, ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेता देव पटेलचं वक्तव्य

या ईदला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ पाहा आणि पुढच्या ईदला ‘सिकंदर’ तुमच्या भेटीला येईल…तुम्हा सर्वांना ईद मुबारक! चित्रपटाचं दिग्दर्शन एआर मुरुगदास करतील, तर निर्मिती साजित नाडियाडवालांची असेल, अशी पोस्ट एक्सवर सलमान खानने केली आहे.

२०१० मधील ‘दबंग’पासून सलमानने ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज करणं सुरू केलं होतं. ‘किसी का भाई किसी की जान’, ‘भारत’, ‘रेस 3’ आणि ‘ट्यूबलाइट’ हे चार चित्रपट वगळता प्रत्येक ईदला रिलीज झालेले त्याचे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. यामध्ये ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुल्तान’ यांचा समावेश आहे.