बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच ‘पठाण’मध्ये सलमानने शाहरुख खानबरोबर कॅमिओ देऊन कित्येक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अद्याप याचा ट्रेलर आलेला नसून केवळ २ गाणी आणि टीझर प्रदर्शित झालेला आहे. सलमानचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. यात सलमान खानबरोबर अभिनेत्री पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापाठोपाठ सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाची चाहते वाट बघत आहेत. अशातच सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलबद्दल नवी माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. आता याच सीक्वलमध्ये करीना कपूर ऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीची वर्णी लागल्याचं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : ‘हॅरी पॉटर’ फेम डॅनियल रॅडक्लिफ होणार बाबा; गर्लफ्रेंड एरिन डार्कचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलमध्ये करीना कपूरला डावलून आता तिच्याजागी पूजा हेगडेला घेतल्याची चर्चा होत आहे. अर्थात याबद्दल काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इटाईम्सला एका खात्रीशीर सूत्राने दिलेल्या माहीतीनुसार “चित्रपटाचं नाव पवन पुत्र भाईजान हे नक्की आहे, पण बाकीच्या गोष्टी अफवा आहेत, अजून कथाच पूर्ण झालेली नाही तर अभिनेत्रींना रीप्लेस करायची गोष्ट कशी घडेल?”

‘बजरंगी भाईजान’ हा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात सलमान खानसह करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, ओम पुरी, हर्षाली मल्होत्रा ​​हे प्रमुख भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या सीक्वलच्या बातमीमुळे याविषयी बऱ्याच गोष्टींची चर्चा होताना दिसत आहे. पूजा हेगडे नुकतीच रणवीर सिंगच्या ‘सर्कस’मध्ये झळकली होती. आता सलमान खानबरोबर पूजाची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर कशी दिसेल हे ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan bajrangi bhaijaan sequel rumours are that kareena kapoor is replaced by pooja hegde avn
Show comments