Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल यांनी नोंदणी पद्धतीनं लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. काल, २३ जूनला दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सोनाक्षी व झहीरच्या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि जवळेचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर जोरदार रिसेप्शन पार्टी झाली. या रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले; ज्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शन पार्टीला सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा मुलगा अबीरबरोबर पोहोचला होता.

गेल्या २७ वर्षांपासून बॉडीगार्ड शेरा सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणाचं काम करत आहे. अनेक कार्यक्रमात, पार्टीमध्ये शेरा सलमानबरोबर पाहायला मिळतो. पण काल सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शन पार्टीला शेरा सलमान खानबरोबर दिसला नाही. कारण सोनाक्षीनं खास शेराला लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे शेरा पाहुणा म्हणून मुलगा अबीरबरोबर रिसेप्शन पार्टीमध्ये पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: लग्नात सोनाक्षी सिन्हाने राहत फतेह अली खानच्या गाण्यावर ‘अशी’ केली जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत, शेरा व अबीर दोघंही सारख्या रंगाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळाले. दोघांनी काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं. रिसेप्शनमध्ये येताच अबीरनं हात जोडून पापाराझीचे आभार मानले. बापलेकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Video: लग्नात सोनाक्षी सिन्हाने राहत फतेह अली खानच्या गाण्यावर ‘अशी’ केली जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

दरम्यान, शेराचा मुलगा अबीर सिनेसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त गेल्या वर्षी आलं होतं. त्यावेळेस सतीश कौशिक यांच्या एका स्क्रिप्टविषयी चर्चा सुरू होती. सलमान स्वतः काही कलाकारांना भेटला होता. पण नंतर हा प्रोजेक्ट रखडला. अबीरच्या पदार्पणाची चर्चा बंद झाली. पण अजूनही शेराचा मुलगा यासाठी मेहनत करत आहे. अबीरसाठी सलमान खान आयडॉल आहे. सलमानला फॉलो करत अबीरनं चांगली बॉडी केली असून फिटनेसवर काम सुरू आहे.