Salman Khan Crying Outside Hospital Shocking Video Viral : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो रुग्णालयाबाहेर रडताना दिसतोय. त्याचा हा पाहून खान कुटुंबात नेमकं काही घडलंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता आणि ते काळजी व्यक्त करत होते.
सलमान खानच नाही तर त्याची आई सलमा खान, सोहेल खान व अरबाज खानची मुलं देखील रुग्णालयाबाहेर दिसली. काही महिन्यांपूर्वी सलीम खान रुग्णालयात दाखल होते, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे का? असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र तसं काही नसल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान खानची अत्यंत जवळची मैत्रीण कुमुद राणे हिचं निधन झालंय. तिच्या निधनाने सलमान खानसह त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयाबाहेर आल्यावर सलमान खानला अश्रू अनावर झाले आणि तो त्याच्या मित्राला मिठी मारून रडू लागला.
पाहा सलमान खान रडतानाचा व्हिडीओ
कुमुद राणे ही दुबईत बिझनेस हेड होती. ती सलमानची मैत्रीण होती, त्याचबरोबर खान कुटुंबाशीही तिचं घट्ट नातं होतं. तिच्या निधनाने संपूर्ण खान कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सलमान खानपाठोपाठ खान कुटुंबातील इतर सदस्य कुमुदच्या निधनाची बातमी समजताच रुग्णालयात पोहोचले.
काही दिवसांपूर्वी पापाराझींवर भडकलेला सलमान खान</p>
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना पापाराझींनी सलमानचा पाठलाग केला आणि त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाचा मोठ्याने उल्लेख करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर सलमान खान भडकला होता. त्याने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट करून नाराजी व्यक्त केली होती. संतापलेल्या सलमानने “पागल हो गए हो का?” अशी प्रतिक्रिया दिली होती. एखाद्याच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असताना असं वर्तन करणं कितपत योग्य आहे, असंही त्याने म्हटलं होतं.
“जर मला हॉस्पिटलमध्ये असा कोणी पापाराझी दिसला, जो माझ्या दुःखाची मजा घेत असेल… तीच प्रेस, ज्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहिलो, ज्यांच्याशी मी संवाद साधला, ज्यांची मी काळजी घेतली आणि त्यांनाही रोजीरोटी कमावता यावी याकडे लक्ष दिलं. जर त्यांना माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा. एन्जॉय करू नका. फोटो महत्त्वाचा आहे की आयुष्य? असे मी शंभर जाळून टाकीन. जेव्हा तुमचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल, तेव्हा मी असं वागेन का?” असं सलमान खान त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला होता.
