सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं बॉलिवूडमधील सर्वात चर्चिल्या गेलेल्या आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्या काळात ही जोडी चाहत्यांची प्रचंड लाडकी होती. सलमानने ऐश्वर्याला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मदत केली होती. दोघे जाहीरपणे एकमेकांचं प्रेम जाहिरपणे व्यक्त करत असायचे. पण नंतर मात्र त्यांच्या नात्यात कटुता आली आणि त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर सलमान खान ऐश्वर्या रायबद्दल बरेचदा बोलत असते, पण ऐश्वर्या मात्र त्याच्या नावाचा उल्लेख झाला की बोलणं टाळते.
सलमान खानचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सलमान खानसमोर जेव्हा जेव्हा ऐश्वर्या नावाचा उल्लेख होतो तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असते असं दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओत विविध ठिकाणच्या क्लिप्स आहेत. एका कार्यक्रमात महिला पत्रकाराने ‘हॅलो सलमान सर, मी ऐश्वर्या,’ असं म्हटलं. सलमानने तिकडे बघणं टाळलं. त्यावर ‘सर किमान इकडे बघा,’ असं ती म्हणाल्यावर त्याने ‘कुठे’? असं विचारलं.
पुढे क्लिपमध्ये सलमान खानला हम दिल दे चुके सनमच्या पोस्टरबद्दल विचारण्यात येतं. तेव्हा काही क्षण तो शांत राहतो आणि मग ते पोस्टरही चांगलं होतं इतकंच म्हणतो. त्यानंतर अनिल कपूर सलमानशी बोलताना ऐश्वर्याचा उल्लेख करतात, तेव्हाही तो शांत राहतो. स्टार गिल्ड अवॉर्ड्समध्ये सलमान खानने करण जोहरला विचारलं होतं की ‘जर तुला मुलगी व्हायचं वरदान मिळालं, तर तुला कोणत्या अभिनेत्रीसारखं व्हायला आवडेल?’ यावर करण जोहरने ऐश्वर्या रायचं नाव घेतलं होतं. मग सलमान खानने ‘ऐश्वर्या राय बच्चन का?’ असं विचारलं होतं. त्यावर ‘तुम्ही कारण विचारताय?’ असं करण सलमानला म्हणाला होता.
पाहा व्हिडीओ
सलमान खान व ऐश्वर्या रायचे ब्रेकअप का झाले होते?
सलमान ऐश्वर्याबाबत खूप पझेसिव्ह होता. तिला इतर अभिनेत्यांबरोबर काम करताना पाहून तो अनेकदा रागावयचा, असं म्हटलं जातं. ऐश्वर्याने नंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये आरोप केला होता की, सलमानने तिच्यावर हात उचलला होता आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला होता. मात्र, सलमानने मारहाणीचे आरोप नेहमीच फेटाळून लावले. ऐश्वर्याच्या पालकांना हे नाते अजिबात मान्य नव्हते. सलमानच्या वागणुकीमुळे ते नाराज होते आणि ऐश्वर्याने हे नाते तोडावे अशी त्यांची इच्छा होती, असं म्हटलं जातं. यानंतर दोघे वेगळे झाले, परत कधीच ते एकत्र दिसले नाही.
