scorecardresearch

“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप

सलमान खानने शारिरीक छळ केल्याचा सोमी अलीने केला आरोप

“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप
सलमान खानवर त्याच्या एक्स गलफ्रेंडने गंभीर आरोप केले आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आजवर सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीसहही सलमान अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. सोमी अलीने आता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

सोमी अलीने सलमानबरोबरचा जुना फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने सलमानवर गंभीर आरोप केले होते. “भारतात माझे शो बॅन केले. मला कायद्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तू एक नीच माणूस आहेस. सिगारेटचे चटके देऊन तू माझं शारीरिक शोषण केलं आहेस. या सगळ्यातून बचाव करण्यासाठी माझ्याकडे ५० वकील आहेत” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा>>…अन् राणादाने भर मांडवात पाठकबाईंना केलं किस; अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल

somy-ali-on-salman-khan

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सिद्धार्थ जाधवची एन्ट्री; आता कोणता नवा ट्वीस्ट येणार?

“कित्येक महिलांचा शारीरिक छळ करणाऱ्या सलमान खानला अनेक अभिनेते व अभिनेत्री पाठिंबा देत आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आता याच्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे”, असंही सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सोमीने ही पोस्ट काही वेळाने डिलीट केली आहे.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर

सलमान खानची चाहती असल्याचं सोमी अलीने सांगितलं होतं. ते दोघेही अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सलमानच्या आई-वडिलांबरोबरही सोमीचे चांगले संबंध जुळले होते. सलमान खानने धोका दिल्यामुळे ब्रेकअप केल्याचं सोमीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. याआधीही ऑगस्ट २०२२मध्ये सोमीने सलमानवर गंभीर आरोप केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 14:49 IST

संबंधित बातम्या