Salman Khan Father gets Threat from Lawrence Bishnoi Gang : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाला बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सलमानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते सलीम खान यांना धमकी मिळाली आहे. सलीम खान घराजवळच्या उद्यानात बसलेले एक इसम व बुरखा परिधान केलेली महिला स्कूटरवरून त्यांच्या जवळ गेले. यावेळी महिलेने सलीम खान यांना लॉरेन्श बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी दिली.

सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी देखील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. वॉक करून ते घराजवळच्या उद्यानातील एका बाकावर जाऊन बसले होते. त्याचवेळी सलमानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाजूने बँडस्टँडच्या दिशेने एक स्कूटर आली. या स्कूटरवर एक इसम व त्याच्या मागे एक बुरखा परिधान केलेली महिला बसली होती. या स्कूटरने यू टर्न घेतला आणि चालक ती स्टूकर घेऊन सलीम खान यांच्याजवळ गेला. त्यानंतर ती महिला सलीम खान यांना म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई को भेजूं क्या?” ७४४४ असा त्या स्कूटरचा नंबर होता. पोलीस आता स्कूटरचा शोध घेत आहेत. तसेच स्कूटर चालवणारा इसम व त्याच्या मागे बसलेल्या महिलेचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?

हे ही वाचा >> Emergency : कंगना रणौत यांच्या इमर्जन्सी चित्रपटाचं काय होणार? “CBFC ने २५ सप्टेंबरपर्यंत…”, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

अभिनेता सलमान खान सध्या मुंबईत नाही. तो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी शहराबाहेर गेला आहे. नुकताच तो कडक सुरक्षाव्यवस्थेत विमानतळ परिसरात दिसला होता. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानच्या वडिलांना धमकी दिली आहे. यापूर्वी अनेकदा या टोळीने सलमान खान व त्याच्या कुटुंबाला धमकी दिली होती.

हे ही वाचा >> Video: एका मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, पुन्हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

सलमान खानच्या ताफ्यात दुचाकी शिरली

दरम्यान, बुधवारी गॅलेक्सी अपार्टमेंटहून विमानतळाच्या दिशेने जणाऱ्या सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात एक दुचाकीस्वार शिरला होता. एका दुचाकीवरून भरधाव वेगात सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात शिरलेल्या तरुणाला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दुचाकीस्वार मेहबूब स्टुडिओ आणि गॅलेक्सी अपार्टमेंटदरम्यान सुरक्षा ताफ्यात शिरला. त्यामुळे सुरक्षा रक्षक सतर्क झाले. संशयित दुचाकीस्वार वेगातच सलमान बसलेल्या मोटरगाडीजवळ गेला.सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून तो सलमानच्या गाडीजवळून जात होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.