scorecardresearch

“आता पुरे…” सलमान खानच्या गायकीने नेटकरी हैराण, नव्या गाण्यामुळे भाईजान ट्रोल

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची त्याचे चाहते वाट बघत असतानाच दुसरीकडे तो चित्रपटामुळे ट्रोल होऊ लागला आहे.

salman khan song

सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. एकीकडे या चित्रपटाची त्याचे चाहते वाट बघत असतानाच दुसरीकडे तो चित्रपटामुळे ट्रोल होऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सलमान खानचा लूक समोर आला होता. तर आता जसजसं या चित्रपटाचा प्रदर्शन जवळ येत आहे तसतसं या चित्रपटातील गाणी प्रदर्शित होऊ लागली आहेत. आज या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. परंतु त्यातील सलमानचा अंदाज पाहून प्रेक्षकांनी डोक्यालाच हात लावला आहे.

आणखी वाचा : Video: सिक्युरिटी चेकिंग न करताच करण जोहर निघाला विमान पकडायला, दाराबाहेर उभ्या सुरक्षारक्षकाने केलं असं काही की…

त्या गाण्यामध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा रोमँटिक अंदाज दिसत असून सलमान खानने स्वतः हे गाणं गायलं आहे. तर अरमान मलिकने या गाण्याला चाल लावली आहे. परंतु अभिनेता म्हणून हिट ठरलेला सलमान खान गायक म्हणून मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला दिसत नाही. या प्रयत्नावरून आता लोक त्याला ट्रोल करू लागले आहेत.

हेही वाचा : सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर? अजिबात नको…या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी नाकारले त्याचे चित्रपट

या गाण्याच्या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “त्याचा आवाज खूप भयानक आहे. इसे वाचवण्यासाठी त्याने स्वतः गाणं गायलं का?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “याचा आवाज खूप एकाच पट्टीतला आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “याने कशाला गाण्याचा प्रयत्न केला? अभिनय करतोय ते पुरे.” त्यामुळे आता सलमानवर नेटकरी टीका करू लागले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:37 IST

संबंधित बातम्या