Salman Khan interacting with fan : बॉक्स ऑफिसवर दर शुक्रवारी नवे सिनेमे येतात. आता तर जुने सिनेमे सुद्धा सिनेमागृहात पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आला आहे. या सर्व ट्रेंडमध्ये चाहत्यांचे लाडके सुपरस्टार मात्र यंदा पडद्यावर फार कमी दिसत आहेत. अभिनेता सलमान खानचा तर २०२४ मध्ये एकही सिनेमा प्रदर्शित होणार नसून चाहत्यांना त्यांचा भाईजान थेट पुढील वर्षीच पडद्यावर दिसणार आहे. सलमान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. सलमान खान (Salman Khan) यावर्षी पडद्यावर दिसणार नसला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो चाहत्यांना भेटत आहे. सध्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या एका ज्येष्ठ चाहतीजवळ थांबून आपुलकीने गप्पा मारताना दिसत आहे. सलमान 'बिग बॉस' च्या सेटवर आला होता. तेव्हा त्याच्या एका ज्येष्ठ चाहतीने त्याला अडवलं. सलमानही कुठलेही आढेवेढे न घेता थांबला आणि त्या महिलेशी आपुलकीने गप्पा मारल्या. हा प्रसंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेही वाचा.Video : सारा आणि कार्तिकचं एकमेकांना आलिंगन, प्रेमाची मिठी की?…. सलमान मुंबईत आगामी बिग बॉस या शोचे काही प्रोमो शूट करण्यासाठी जात होता, तेव्हा एका ज्येष्ठ महिलेने त्याला अडवलं. सलमानही थांबला आणि दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. व्हिडीओत त्या बाई सलमानला बघून भावूक झाल्या अस दिसतंय. त्या सलमानच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचं सांगत आहेत. त्यांचे हावभाव पाहून सलमानही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे. सलमानने काही क्षण थांबून त्या महिलेची भेट घेतली, ज्यामुळे ती महिला आनंदी दिसत आहे. सलमानच्या या कृतीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सलमानचे चाहते यावर कमेंट्स करत आहेत. एक चाहता म्हणतो, "सलमान खऱ्या अर्थाने माणूसकी जपतो," तर दुसरा म्हणतो, "सलमान दयाळू आहे." आणखी एक युजर म्हणतो, "सलमान स्वीट सुपरस्टार असून त्याला अजिबात अहंकार नाहीये." या व्हायरल व्हिडीओवर सलमानच्या प्रशंसा करणाऱ्या कमेंट्सला उधाण आल आहे. हेही वाचा.थलपती विजयच्या ‘GOAT’ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, ‘इतके’ कोटी कमावले सुरक्षेचा धोका, तरीही भाईजानने घेतली चाहतीची भेट सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर गोळीबारही झाला होता. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानची भेट घेऊन सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे सलमान खान सगळीकडे कडक सुरक्षेसह बाहेर पडत असतो. या व्हायरल व्हिडीओमध्येही सलमानच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक आहेत. तरीही, सलमानने आपल्या सुरक्षेला धोका असूनसुद्धा आपल्या चाहतीची भेट घेतल्याने त्याचं कौतुक होत आहे.