सध्या सलमान खान आणि विकी कौशल अबू धाबीमध्ये ‘आयफा २०२३’मध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहेत. या सोहळ्यात अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. आता आयफा २०२३ च्या पत्रकार परिषदेतून सलमान खान आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून विकीचे चाहते सलमान खानवर चांगलेच नाराज झाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विकी कौशल चाहत्यांबरोबर सेल्फी घेत आहे. तेवढ्यात सलमान खान आपल्या बॉडिगार्डसमवेत तिथे पोहचतो. सलमान खान तिथे येताच विकी सलमानशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करतो, मात्र सलमान खान त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि काही सेकंद थांबल्यानंतर तिथून निघून जातो. सलमानने विकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. एवढेच नाही, तर सलमानचा बॉडिगार्डही विकीला बाजूला ढकलताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

mysterious human like shiny objects floating viral video
एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
kid making sandwich for grandpa viral video
गोंडस चिमुकल्या शेफने बनविले आजोबांसाठी सॅण्डविच! व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक…
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

हा व्हिडीओ बघून विकीचे चाहते सलमान खानवर चांगलेच नाराज झाले आहेत. विकीला सामान्य माणसाप्रमाणे वागवले गेले असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. व्हिडीओ बघून काही लोक सलमानच्या रुबाबाची स्तुती करत आहेत, तर काही जण विकीला दिलेल्या वागणुकीवरून सलमानला फटकारत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘यार, जीवे मारण्याच्या धमक्यांनी इतका घाबरला आहे की, त्याने अक्षरशः स्वतःला अंगरक्षकांनी घेरले आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘जर हा विकी कौशल असेल तर त्याला बाजूला का काढले? दोघेही एकमेकांना भेटू शकले असते.’