मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच सलमान खान दुबईला गेला आहे. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी भाईजान दुबईत आहे. तो सहभागी झालेल्या कार्यक्रमातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान खान एका लक्झरी प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी दुबईला गेला आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री एलनाझ नौरोजीचा खास डान्स परफॉर्मन्स झाला. हा डान्स पाहतानाचा सलमानचा एक व्हिडीओ चर्चेत आहे.

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर

याच कार्यक्रमातील दुसऱ्या एका व्हिडीओत सलमान खान आयोजक रिझवान साजन यांच्यासह बसलेला दिसतोय. तिथे अचानक शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाणं वाजू लागतं. सलमान खान या गाण्यावर स्टेजवर होणारा परफॉर्मन्स लक्षपूर्वक बघताना दिसतोय.

दरम्यान, १४ एप्रिल रोजी घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान पाच दिवस घरीच होता. १९ एप्रिलला तो सुरक्षा रक्षकांसह मुंबई विमानतळावरून दुबईला रवाना झाला. भाईजान या कार्यक्रमासाठी काही दिवस दुबईत असेल असं म्हटलं जातंय.