Premium

Tiger Ka Message : “जब तक टायगर मरा नहीं…” सलमान खानच्या ‘टायगर ३’चा पहिला प्रोमो प्रदर्शित

प्रोमोमध्ये ‘टायगरचा मेसेज’ आपल्याला पाहायला मिळत आहे अन् याबरोबरच सलमान खानचा जबरदस्त अंदाजही खिळवून ठेवणारा आहे

tiger-ka-message
फोटो : व्हिडीओतून स्क्रीनशॉट

Tiger 3 Teaser : सध्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतं आहे. प्रेक्षकांचा ‘जवान’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बरेच रेकॉर्ड मोडून नवनवीन रेकॉर्ड या चित्रपटाने निर्माण केले आहेत. अशातच आता सलमान खान देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून ‘टायगर ३’च्या टीझरबद्दल जबरदस्त चर्चा होती. आज यश चोप्रा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ठरवल्याप्रमाणे यश राज फिल्म्सनी त्यांच्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पुढचा चित्रपट ‘टायगर ३’चा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये ‘टायगरचा मेसेज’ आपल्याला पाहायला मिळत आहे अन् याबरोबरच सलमान खानचा एक जबरदस्त अंदाजही खिळवून ठेवणारा आहे.

आणखी वाचा : “ते माझ्या आयुष्यातील खलनायक…” वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा

प्रोमोची सुरुवात सलमान खानच्या मेसेजने होते, “मै अविनाश सिंह राठोड, आपके लीये टायगर” असं म्हणत तो त्याच्यावर लागलेल्या देशद्रोहाच्या आरोपाबद्दल स्पष्टीकरण देताना आपल्याला दिसतो. आपल्या देशाला आपण देशभक्त आहोत की देशद्रोही आहोत असा जाब टायगर विचारताना आपल्याला दिसतो. या सगळ्याबरोबरच सलमानची जबरदस्त डायलॉगबाजी अन् दमदार अॅक्शनची झलकही या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘टायगर ३’ हा ‘एक था टायगर’ सीरिजमधील तिसरा भाग आहे. याचा सीक्वल म्हणजेच ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘टायगर ३’ आता यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग झाला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ‘पठाण’ आणि ‘वॉर’ या चित्रपटांच्या कथानकाशी जोडला जाणार आहे. ‘टायगर ३’चं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं असून यात सलमान खान व कतरिना कैफसह इम्रान हाशमीदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. येत्या दिवाळीत म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan katrina kaif starrer tiger 3 first promo tiger ka message out now avn

First published on: 27-09-2023 at 12:12 IST
Next Story
“ते माझ्या आयुष्यातील खलनायक…” वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा