Premium

Farrey Teaser: सलमान खानने भाची अलिजेहला बॉलीवूडमध्ये केलं लाँच, ‘फर्रे’चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

Farrey Teaser: सलमान खानची भाची बॉलीवूडमध्ये करतेय पदार्पण, ‘फर्रे’चा टीझर पाहिलात का?

Farrey Teaser
फर्रेचा टीझर प्रदर्शित (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट्स)

खान कुटुंबातील नवी पिढी म्हणजेच सलमान खानची भाची बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहिलं असेल की अनेक मोठे स्टार्स त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘फर्रे’ नावाची पोस्ट शेअर करत होते. पण त्याबाबत इतर काहीही माहिती ते देत नव्हते, त्‍यामुळे हे नक्की काय आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. २५ सप्टेंबर रोजी सलमान खानने एक व्हिडीओ शेअर करत हे गुपित उलगडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Photos: भरजरी लेहेंगा, ओढणीवर राघवरावांचं नाव अन्…; परिणीती चोप्राच्या लग्नातील फोटोंनी वेधलं लक्ष

सलमान खानने त्याची भाची अलिजेह अग्निहोत्रीला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सलमानने शेअर केलेल्या व्हिडीओतून हे स्पष्ट होत आहे. सलमानने फर्रे चित्रपटाचा टीझर शेअर केला असून त्या अलिजेह दिसत आहे. फर्रे हा अलीझेहचा पहिला चित्रपट आहे. याची निर्मिती सलमान खान फिल्म्स करत आहे.

Video: शाहरुख व सलमान खान पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी, बाप्पांचे दर्शन घेत काढले फोटो; आशा भोसले यांचीही हजेरी

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. “मी सकाळी एक नवीन F शब्द शिकलो आहे… मी तुम्हाला चार वाजता त्याबद्दल सांगेन.” त्यानंतर चार वाजताच त्याने चित्रपटाचा टीझर रिलीज केला. टीझरच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिलं, “मी या F शब्दाबद्दल बोलत होतो, तुम्हाला काय वाटलं? फर्रेचा टीझर आला आहे.”

‘फर्रे’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये अलिजेह देखील दिसत आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा शाळकरी मुलांभोवती फिरत असल्याचं टीझरवरून दिसतंय. टीझरमध्ये अलिझेह खूपच घाबरलेली दिसत आहे. दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले आहे. यामध्ये अलिझेह व्यतिरिक्त, झेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय आणि जुही बब्बर सोनी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan launches niece alizeh in bollywood debut movie farre teaser released hrc

First published on: 26-09-2023 at 08:28 IST
Next Story
थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती चोप्रा पोहोचली सासरी, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष