Salman Khan met Malaika Arora Family: अभिनेत्री व मॉडेल मलायका अरोरा हिचे सावत्र वडील अनिल मेहता यांचे निधन झाले. त्यांनी बुधवारी (११ सप्टेंबरला) वांद्रे येथील घरातील बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या केली. ते सहाव्या मजल्यावर राहत होते. अनिल मेहता यांच्यावर गुरुवात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा सलमान खानने मलायका व तिच्या कुटुंबाची भेट घेतली.
मलायका अरोरा अरबाज खानची पहिली पत्नी होती. काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. पण या कठीण काळात मलायकाच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे कुटुंबीय तिच्याबरोबर खंबीरपणे उभे दिसले. मलायकाच्या वडिलांचे निधन झाल्यावर सर्वात आधी अरबाज खान तिथे पोहोचला होता. त्यानंतर सोहेल खान, त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान आले होते. अरबाजच्या दोन्ही बहिणी अलविरा व अर्पिताही मलायकाच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी सलमाननेही मलायका व तिच्या कुटुंबाची भेट घेतली.
मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? शवविच्छेदन अहवालातून माहिती आली समोर
पाहा व्हिडीओ –
गुरुवारी रात्री उशीरा सलमान वांद्रे येथील मलायकाच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचला. फिल्मीज्ञानने सलमानचा व्हिडीओ शेअर केला आहे. याच घरी अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. सलमानव्यतिरिक्त अरबाज खान व त्याची दुसरी पत्नी शुरा, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, गौरी खान यांच्यासह बरेच जण मलायकाच्या घरी भेटीला गेले होते. अर्जुन कपूर ही घटना घडली त्या दिवसापासून मलायका व तिच्या कुटुंबाबरोबर आहे. रात्री उशीरा अर्जुन, मलायका व तिची बहीण अमृता इथून आपापल्या घरी जाताना दिसले होते.
हेही वाचा– “मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर
दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली, तेव्हा मलायकाची आई जॉयसी घरात होत्या. मलायका पुण्यात होती. तिच्या वडिलांनी हे धक्कादायक पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी वाटत असल्याचं पोलीस म्हणाले होते.