scorecardresearch

भाईजानच्या चाहत्यांसाठी सरप्राईज; ‘पठाण’बरोबर सलमानच्या ‘या’ चित्रपटाचा टीझर होणार प्रदर्शित

‘पठाण’मध्ये सलमान खानचीसुद्धा एक छोटीशी झलक पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

भाईजानच्या चाहत्यांसाठी सरप्राईज; ‘पठाण’बरोबर सलमानच्या ‘या’ चित्रपटाचा टीझर होणार प्रदर्शित
फोटो : सोशल मीडिया

शाहरुख खान, दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ २ दिवसात चित्रपटगृहात झळकणार आहे. चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत. ठीकठिकाणी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम रचतो आहे. तिकीटबारीवर यंदा शाहरुख दमदार ओपनिंग करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता मात्र शाहरुखचा ‘पठाण’ बघताना बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानच्या चाहत्यांनासुद्धा एक सरप्राइज मिळणार आहे.

२५ जानेवारीला ‘पठाण’बरोबर भाईजानसुद्धा प्रेक्षकांची भेट घेणार आहे. ‘पठाण’बरोबरच सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वप्रथम रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या ‘तू झूठी मै मक्कार’ याचा ट्रेलर पठाणबरोबर प्रदर्शित होणार होता, पण आता सलमानच्या टीझर येणार हे समजताच त्याचे चाहतेसुद्धा यासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत.

‘पठाण’मध्ये सलमान खानचीसुद्धा एक छोटीशी झलक पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटही पुढच्यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, सलमान खानचे चित्रपट प्रामुख्याने ईदच्या दिवशी प्रदर्शित होताना पाहायला मिळाले आहेत. ‘वॉन्टेड’ नंतर ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘ट्यूबलाइट’ आणि ‘भारत’सह आता ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३ मधील ईदला सिनेमागृहात दर्शकांच्या भेटीला दाखल होणार आहे.

आणखी वाचा : व्हायरल फोटो प्रकरणी राखी सावंतची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाकडे धाव

फरहाद सामजीद्वारा दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली असून या अ‍ॅक्शन-पॅक चित्रपटात पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत. याबरोबरच सलमानच्या ‘टायगर ३’ची सुद्धा चांगलीच हवा आहे. सलमान खानचे हे दोन्ही आगामी चित्रपट पुढच्या वर्षी ईद आणि दिवाळीला दर्शकांच्या भेटीला येणार असून, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतील यात काहीच शंका नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या