Salman Khan Aishwarya Rai news: ९० च्या दशकात ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटामुळे सलमान खान व ऐश्वर्या रायची जोडी प्रचंड चर्चेत आली होती. चित्रपटातील त्यांचा ऑनस्क्रीन रोमान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता पण, त्यापेक्षाही ऐश्वर्या-सलमानच्या रिअल लाइफ डेटिंगच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. हे नातं लग्नापर्यंत टिकू शकलं नाही पण, आजही सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल त्यांचे चाहते चर्चा करतात. या दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल त्यावेळी बॉलीवूडमध्ये अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

ज्यावेळी ऐश्वर्या-सलमानच्या ब्रेकअपची बातमी सर्वत्र पसरली…त्यानंतर दोघंही एकमेकांशी कधीच बोलले नाहीत किंवा त्यांनी एकत्र काम सुद्धा केलं नाही. पुढे, काही वर्षांनी म्हणजे एप्रिल २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला.

सुनीता आहुजा यांच्या पॉडकास्टला नुकतीच पत्रकार हीना कुमावत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आराध्याचा जन्म झाल्यावर सलमानने काय प्रतिक्रिया दिली होती याबद्दल खुलासा केला आहे.

हीना कुमावत सांगतात, “जेव्हा आराध्याचा जन्म झाला…त्याच दरम्यान सलमान खान एका मोबाइल कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाला होता. यामुळे तो अनेक माध्यमांना मुलाखती देत होता. ऐश्वर्या-अभिषेकला मुलगी झालीये, ते आई-बाबा झालेत याबाबत मीडियाला सलमान खानची प्रतिक्रिया हवी होती…आणि यासाठी प्रत्येकावर दबाव होता.”

“त्यांना ११ मुलं व्हावीत…”

हीना पुढे म्हणाल्या, “मला सुद्धा याबाबत सलमान खानची प्रतिक्रिया काय आहे हे विचारायला सांगितलं होतं. पण, मला हा प्रश्न विचारणं योग्य वाटलं नाही. मुळात ऐश्वर्या आधीच विवाहित आहे आणि सलमानचा तिच्याशी कोणत्याच प्रकारचा संबंध नव्हता. दोघं एकमेकांशी बोलतही नाहीत. त्यामुळे एक महिला म्हणून मला हा असा प्रश्न त्याला विचारणं अयोग्य वाटलं आणि मी प्रश्न विचारण्यास नकार दिला होता.”

पुढे काही दिवसांनी सोहेल खानला मुलगा झाला. त्यावेळी मात् मी सलमानला स्वत:हून विचारलं होतं की, “तू आता काका झालास कसं वाटतंय?” यावर सलमान म्हणाला होता, “मी फक्त काकाच नाही तर मामा सुद्धा झालोय…त्यांना ११ मुलं व्हावीत हीच माझी इच्छा आहे.”

अभिषेक पत्नी ऐश्वर्याविषयी काय म्हणाला?

नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्याचं कौतुक करत सांगितलं होतं, “आराध्याची बालपणापासून ऐश्वर्याने खूप काळजी घेतलीये. आराध्याच्या संगोपनाचं संपूर्ण श्रेय ऐश्वर्याचं आहे. ती आराध्याला सांभाळतेय म्हणून मी चित्रपटांमध्ये निर्धास्तपणे काम करू शकतोय, शूटिंगसाठी बाहेर जाऊ शकतो. ती खरंच खूप चांगली आई आहे.”