scorecardresearch

Premium

Video : भर कार्यक्रमात विकी कौशलने कतरिनाला विचारलेलं ‘मुझसे शादी करोगी?’ तिचं उत्तर ऐकताच सलमान खानने…

विकी कौशलने कतरिना कैफला लग्नाची मागणी घालताच सलमान खानने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

salman-katrina-vickey
विकिने कतरिनाला प्रपोज करताच सलमान खानची काय होती प्रतिक्रिया

विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी-सारा ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, खऱ्या आयुष्यात विकी कौशलने २०२१ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफबरोबर लग्नगाठ बांधली परंतु विकी-कतरिनाची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती. आणि पहिल्याच भेटीत विकीने कतरिनाला थेट लग्नाची मागणी घातली होती.

हेही वाचा- महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; सारा अली खान सडेतोड उत्तर देत म्हणाली, “या माझ्या…”

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

याच अवॉर्ड शोमध्ये सलमान खानही सहभागी झाला होता. विकीने कतरिनाला लग्नाची मागणी घातलाच सलमान खानने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती. सलमानच्या या प्रतिक्रियेचा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुरस्कार सोहळ्यात विकी सूत्रसंचालन करीत होता तेव्हा त्याने “कतरिना मी तुझा खूप मोठा चाहता आहे… सध्या सगळे जण लग्न करीत आहेत तू सुद्धा एखाद्या चांगल्या विकी कौशलचा शोध घेऊन लग्न का करीत नाहीस,” असा प्रश्न करीत अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली होती. विकीने कतरिनाला प्रपोज केल्यानंतर सलमान त्याची बहीण अर्पिताच्या खांद्यावर चक्कर येऊन पडण्याचे नाटक करताना दिसत आहे. सलमान, कतरिना आणि विकीचा हा जूना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विकी आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘फोन भूत’ या चित्रपटात कतरिना शेवटची दिसली होती. कतरिना सलमान खानच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच ती ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटात विजय सेतुपतीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan reaction viral after vicky kaushal proposed katrina in the award show in the first meeting dpj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×