Salman Khan reveals why he has lost 16 kg: सलमान खान गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यावेळी त्याचे वजन कमी झाल्याचे दिसले, त्यावेळी अनेकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जेव्हा जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलन करत होते, त्यावेळीही त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता.

नुकताच तो ‘अलायन्स’ या शोमध्ये त्याचा लहान भाऊ सोहेल खानला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी शोमध्ये त्याने केलेली वक्तव्ये चर्चेत आहेत. या शोमध्ये त्याने त्याच्या वजनाबद्दलही खुलासा केला. त्याचे वजन कोणत्याही आजारामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कमी झाले नाही, तर त्याने ठरवून वजन कमी केल्याचे सांगितले.

सलमान खान वजन कमी करण्याबद्दल काय म्हणाला? वाचा…

सोहेल खानशी बोलताना सलमान खानने त्याच्या फिटनेस गोलबद्दल सांगितले. सलमान म्हणाला की, मी माझ्या फिटनेसवर काम करत आहे आणि मी वजन घटवले आहे. त्यावर सोहेलनेदेखील त्याचे फिटनेस गोल सांगितले. तो म्हणाला की मी १२ किलो वजन कमी केले आहे. त्यावर सलमानने स्वत: किती वजन कमी केले आहे, याबद्दल सांगितले.

“भविष्यातील काही प्रोजेक्टसाठी…”

पुढे त्याने वजन कमी करण्याचा का निर्णय घेतला, याबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “भविष्यातील काही प्रोजेक्टसाठी तयारी करत असून, त्यासाठी ठरवलेल्या वजनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.”

काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यावेळी त्याच्या चाहत्यांना खूप प्रश्न पडले होते. सलमानला नेमके काय झाले आहे, त्याची प्रकृती कशी आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले होते. जेव्हा त्याच्या प्रकृतीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली, त्यावेळी सलमान खानने स्वत:चे काही फोटो शेअर करत चाहत्यांना तुम्ही कसे आहात असे विचारले.

सलमान खानचा आगामी सिनेमा

दरम्यान, आता सलमान खान लवकरच ‘मातृभूमी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणार का, प्रेक्षक कशी दाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.