scorecardresearch

“आई कधीही माझ्या कानाखाली…” ५७ वर्षीय सलमान खानचं वक्तव्य चर्चेत

अभिनेता सलमान खानचं त्याचे आई- वडिल आणि त्याच्या कुटुंबाशी खूप खास बॉन्डिंग असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं

“आई कधीही माझ्या कानाखाली…” ५७ वर्षीय सलमान खानचं वक्तव्य चर्चेत
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान २७ डिसेंबरला ५७ वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन झालं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अगदी शाहरुख खानपासून ते एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीपर्यंत बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी सलमान खानच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. एवढंच नाही तर संगीता आणि सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. अशातच आता त्याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

सलमान खान ५७ वर्षांचा झाला असला तरीही त्याच्या स्वॅग काही अद्याप कमी झालेला नाही. आजही सलमान खान बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. पण त्याचे कुटुंबीय आणि घरातील सदस्यांसाठी मात्र सलमान खान आजही बालपणापासून जसा आहे तसाच आजही आहे. त्याचे मित्र त्याच्या आजही तसेच बोलतात जसे बालपणी बोलत असत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानने सांगितलं की त्याचं वागणं कुटुंबासाठी पूर्वीसारखंच आहे.

आणखी वाचा- सलमान खानची ‘बिग बॉस १६’च्या फिनालेमधून एग्झिट? ‘हा’ कलाकार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने सांगितलं की, त्याचे बालपणीचे मित्र आजही त्याच्या संपर्कात आहेत. मागची ४०-४५ वर्ष सगळे मित्र आजही त्याच्याबरोबर आहेत. त्यामुळे ते सगळेच त्याच्याशी पूर्वीप्रमाणेच बोलतात आणि वागण्यातही एक वेगळाच सहजपणा असतो. त्याचं त्याच्या भावा-बहिणींशी खूपच वेगळं बॉन्डिंग आहे. सामान्य कुटुंबाप्रमाणेच आपल्याही घरातील वातावरण असल्याचं सलमान खानने सांगितलं.

सलमान खान म्हणाला, “अनेकदा माझ्या वडिलांच्या बोलण्यातून मला नेहमीच जाणवतं की ते त्यांच्या मोठ्या मुलाला तसंच वागवतात जसं ते बालपणापासून वागवत आले आहेत. त्यांचा हा हक्क आहे की जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते आपल्या मुलाला मारू शकतात. एवढंच नाही तर माझी आई मला कधीही कानशीलात लगावू शकते आणि तिला उलटून बोलण्याची माझी हिंमत नाही. मी बाहेर हिरो असलो तरी घरी माझ्या आई- वडिलांचा मुलगाच आहे. मला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीही मला अभिमान वाटतो की मी या कुटुंबात जन्मलो.”

आणखी वाचा- रितेश देशमुख आईला जिनिलीयाची मास्तरीणबाई का म्हणाला? पाहा व्हिडीओ

दरम्यान सलमान खानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं तर तो नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यात दिसला होता. याशिवाय लवकरच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आगामी काळात ‘टायगर ३’ हा त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 19:15 IST

संबंधित बातम्या