बॉलीवूडमधील दोन लोकप्रिय कलाकार सलमान खान आणि संजय दत्त हे खूप मोठ्या काळानंतर एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. प्रसिद्ध गायक ए. पी. ढिल्लनने आगामी म्युझिक प्रोजेक्टमध्ये संजूबाबा आणि भाईजान एकत्र दिसणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर शेअर केलेल्या मोशन आर्टमधून केली होती. आता सलमान खानने एक्स अकाउंटवर, 'ओल्ड मनी' या प्रोजेक्टचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना त्याने ९ ऑगस्टला 'ओल्ड मनी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सलमान खान ए. पी. ढिल्लनला विचारतो, कुठे चालला आहे. त्यावर अर्ध्या तासात परत येतो, असे ए. पी. ढिल्लनने उत्तर दिले आहे. त्यावर सलमान खान त्रासून त्याला म्हणतो की, मागच्या वेळेसारखे यावेळी तिथे यायला लावू नको. यानंतर लगेचच ए. पी. ढिल्लन मोठ्याने हसत असल्याचे दिसत आहे. 'ओल्ड मनी'चा हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने, "हे गाणे ब्लॉकबस्टर ठरणार आहे" असे म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, सलमान खानला बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे म्हटले आहे. Old Money out on August 9th @apdhillxn pic.twitter.com/PmhcYRUJhI— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 6, 2024 सलमान खान आणि संजय दत्त हे याआधी 'साजन' आणि 'चल मेरे भाई' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसले होते. आता अनेक वर्षांनंतर या दोन मोठ्या कलाकारांना एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे ए. पी. ढिल्लन हा आपल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता तो अभिनय करतानादेखील दिसणार आहे. हेही वाचा: Video: बायकोची माफी मागत प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, स्वप्नील जोशी म्हणाला, “तुला भीती नाही का?” ए. पी. ढिल्लनने याआधी या ओल्ड मनीचा मोशन आर्ट एक टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रदर्शित करताना संजय दत्त, सलमान खान आणि रॅपर-गीत लेखक शिंदा काहलॉन यांना टॅग करत लिहिले, “तुम्हाला माझी आठवण आली? मला माहीत आहे की, तुम्ही हे पाहिले नाही.” प्रदर्शित केलेल्या मोशन आर्ट व्हिडीओमध्ये सलमान खान, संजय दत्त आणि ए. पी. ढिल्लन दिसत आहे. ९ ऑगस्टला 'ओल्ड मनी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आता सलमान खान, संजय दत्त आणि ए. पी. ढिल्लन हे त्रिकूट कमाल करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.