Unmarried Bollywood celebrities Above 50: आपल्या आवडत्या कलाकारांच्या नवनवीन चित्रपटांबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासही प्रेक्षक उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान मोठ्या चर्चेत आहे. सलमान खानने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच, एकटेपणा संबंधित दिलेल्या कॅप्शनवरुनही चांगलीच चर्चा रंगली होती.

सलमान खान सध्या ६० वर्षांचा आहे. मात्र, अद्याप तो अविवाहित आहे. आतापर्यंत बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले गेले. यामध्ये संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ या लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे ब्रेकअप झाले. त्याच्या सगळ्याच रिलेशनशिपची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

सलमान खानबरोबर इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे वय ५० हून अधिक आहे, तरीही अजूनही त्यांनी लग्न केले नाही. आता हे कलाकार कोणते आहेत, हे जाणून घेऊ…

तब्बू

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखले जाते. तब्बू विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण, तब्बूने आतापर्यंत लग्न केले नाही. विविध मुलाखतींमध्ये लग्न करण्याबद्दल अभिनेत्रीने तिचे मत सांगितले आहे. तब्बूच्या म्हणण्यांनुसार, लग्न न करणे ही तिचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ती सिंगल असली तरी आनंदी आहे.

अक्षय खन्ना

धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ज्या अभिनेत्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, तो अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय खन्ना ५१ वर्षांचा आहे. तो त्याच्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकतो. त्याने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते, त्याला लग्न करायचे नाही. त्याला एकटे राहणे आवडते.

अमिषा पटेल

गदर व कहो ना प्यार है या सिनेमांतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अमिषा पटेल ही आजही सिंगल आहे. तिचे वय ५१ वर्षांहून जास्त आहे.

राहुल खन्ना

अक्षय खन्नाचा मोठा भाऊ राहुल खन्ना सध्या ५३ वर्षांचा आहे. तो त्याच्या स्टाइल आणि लूकमुळे लोकप्रिय आहे. मात्र, तोसुद्धा अक्षयप्रमाणेच अविवाहित आहे.

उदय चोप्रा

धूम फेम अभिनेता व निर्माता उदय चोप्राचे वय ५३ इतके आहे. मात्र, आजही तो अविवाहित आहे.

साजिद खान

दिग्दर्शक साजिद खान ५४ वर्षाचे आहे. मात्र, साजिद खाननेही लग्न केले नाही.

सुष्मिता सेन

लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनचे वय ५० वर्षे इतके आहे, तिनेही आतापर्यंत लग्न केले नाही. तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.