scorecardresearch

सलमान खान बॉडीगार्ड शेराच्या मुलाला करणार लॉन्च; टायगरसाठी अभिनेत्रीच्या शोधात

सलमान खानच्या चित्रपटातून बॉडीगार्ड शेराचा मुलगा करणार पदार्पण; लवकरच चित्रिकरणाला सुरुवात

सलमान खान बॉडीगार्ड शेराच्या मुलाला करणार लॉन्च; टायगरसाठी अभिनेत्रीच्या शोधात
सलमान खान बॉडीगार्ड शेराच्या मुलाला करणार लॉन्च. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी त्याच्या चित्रपटामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमानने आत्तापर्यंत अनेक कलाकरांना त्याच्या चित्रपटात संधी दिली आहे. त्याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱे कलाकार नंतर बॉलिवूडमधील स्टार्स बनले. आता सलमान त्याचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला चित्रपटात संधी देणार आहे.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगर हा सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार असून याचे दिग्दर्शन सतीश कौशिक करणार आहेत. सलमान खानने या चित्रपटाची संपूर्ण तयारी केली असून प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या तो शोधात आहे.

हेही वाचा>> “अरुंधतीला गाताना पाहून…”, प्रसिद्ध गायकाने ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीसाठी केली खास पोस्ट

सलमान खानने या चित्रपटासाठी काही अभिनेत्रींशी संपर्क केल्याचीही माहिती पिंकविलाने दिली आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. चित्रपटाचं नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगरच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चित्रपटाचं शूटिंग २०२३मध्ये सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा>> प्राजक्ता माळीचं कौतुकास्पद काम; पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारल्यानंतर नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यात मिळालं नामांकन

सलमानने यापूर्वी सूरज पांचोली, आयुष शर्मा यांना त्याच्या चित्रपटात संधी दिली होती. कतरिना कैफ, जरीन खान, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रींनीही सलमानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 16:08 IST

संबंधित बातम्या