बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरनंतर सलमानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी आणखीनच उत्सुक आहेत. मात्र, ट्रेलर रिलीज होण्याअगोदरच या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला (ॲडव्हान्स बुकिंग) मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा- “या बाळाचे वडील कोण?” अविवाहित इलियाना डिक्रुझने ती आई होणार असल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न; म्हणाले…

५० हजार तिकिटांची विक्री

चित्रपटाची तिकिटे वेगाने विकली गेली आहेत. यावरून सलमान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते किती उत्सुक आहेत, याचा अंदाज लावता येतो. तसे, चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये ही उत्सुकता कायम आहे. फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी केली आहे. सकनिल्‍कच्‍या वृत्तानुसार, सलमान खानच्‍या या चित्रपटाने पहिल्‍या दिवशी आगाऊ बुकिंग करण्‍यात एक कोटीपर्यंत कमाई केली आहे. एकूण ५० हजार तिकिटांची विक्री झाली आहे.

अवघ्या काही तासातच ॲडव्हान्स बुकिंग फूल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फार मर्यादित ठिकाणी याचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. मुंबईतील आलिशान सिंगल स्क्रीन थिएटर गेटी गॅलक्सिचाही याच्या रात्रीच्या बुकिंगमध्ये समावेश करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारचे शो अवघ्या तासाभरात हाऊसफूल झाल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या या चित्रपटाचे चारपैकी तीन शो आतापर्यंत पूर्णपणे बुक झाले आहेत. वृत्तानुसार, मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटरमध्ये वीकेंडला १५० ते ६०० रुपयांना तिकीट विकले जात आहे. तर दिल्लीत तिकिटाचे दर २५० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत.

हेही वाचा- सेक्स रॅकेट प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक!

सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत. साजिद नाडियादवाला याची निर्मिती केली आहे