ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या या चित्रपटांची आजही चर्चा होते. हे चित्रपट तिने बॉलीवूडचे दोन्ही खान सलमान (Salman Khan) व शाहरुखबरोबर केले होते. ऐश्वर्या व सलमान २४ वर्षांपूर्वीच्या एका सिनेमात बहीण-भावाच्या भूमिकेत झळकले असते, पण नंतर ती भूमिका दुसऱ्या अभिनेत्याने केली होती, असं एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं होतं.

‘हम दिल दे चुके सनम’ नंतर सलमान खान व ऐश्वर्या राय ही बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडींपैकी एक होती. या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतरच्या काळात दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या, त्याचदरम्यान २००० मध्ये त्यांना एका चित्रपटात भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत घेण्यात आलं होतं.

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
kareena kappor saif ali khan omkara
स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास शो, पण घडलं उलट; किस्सा सांगत म्हणाली…
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं देवदर्शन, शेअर केले खास Photos

२००० मध्ये मन्सूर खान दिग्दर्शित ‘जोश’मध्ये ऐश्वर्याने चंद्रचूर सिंहबरोबर मुख्य भूमिका केली होती. यात शाहरुख खानने (Shahrukh Khan) ऐश्वर्याच्या भावाची भूमिका केली होती. पण सुरुवातीला यात सलमान व आमिर खान यांना मुख्य भूमिकेत घेण्याचा विचार दिग्दर्शकाचा होता, याचा खुलासा ऐश्वर्यानेच एका मुलाखतीत केला होता. “आधी या चित्रपटात आमिर व सलमान यांना घ्यायचं ठरलं होतं. नंतर चंद्रचूर व शाहरुख यांनी त्या भूमिका केल्या. चित्रपटातील इतर भूमिकांमधील कलाकार बदलले पण शर्ली तिच राहिली,” असं ऐश्वर्या म्हणाली होती.

“प्रायव्हेट पार्ट दाखवला, दगड फेकले,” बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक अनुभव; म्हणाली, “शिक्षिकेने सांगितलं माझीच चूक…”

दरम्यान, ब्रेकअपनंतर ऐश्वर्या व सलमान यांनी कधीच एकत्र स्क्रीन शेअर केली नाही. ऐश्वर्याने ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मस्तानीची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्या चित्रपटात सलमानने ‘बाजीराव’ साकारावे असं तिला वाटत नव्हतं. संजय लीला भन्साळी आधी ऐश्वर्या व सलमानला घेऊन हा चित्रपट करणार होते. नंतर यात रणवीर सिंह व दीपिका पादुकोण यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. याबाबत ऐश्वर्याने एकदा वक्तव्य केलं होतं. “मला मस्तानीची भूमिका करायची होती पण त्यांच्या (संजय लीला भन्साळी) मनात असलेल्या बाजीरावबरोबर नाही नाही,” असं ऐश्वर्याने म्हटलं होतं.