इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना काम करताना, लहानपणी अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. काही जण याबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसतात. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिला एका व्यक्तीने चुकीचा स्पर्श केल्याचं म्हटलं आहे.
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारी अभिनेत्री समीरा रेड्डीने तिला लहानपणी आलेल्या वाईट प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने हा खुलासा केला आहे. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील इतर प्रसंगांबद्दलही सांगितलं आहे. अभिनेत्रीला या मुलाखतीत तिला कधीच चुकीचा स्पर्श झाल्याचा अनुभव आलाय का अस विचारल्यानंतर तिने एक वाईट अनुभव सांगितला आहे.
समीरा रेड्डीने यावेळी महिलांच्या समस्यांबद्दलही सांगितलं आहे. तर सध्या काही पुरुषांवर त्यांच्या जोडीदारांकडून झालेल्या हलल्याबद्दलही भाष्य केलंय. यावेळी तिला तुम्हाला मुंबईत कधी असा अनुभव आलाय का विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो. मी शाळेत असताना मी माझी बॅग घेऊन जात होते. त्यावेळी माझी शरीरयष्टी चांगली होती. तेव्हा एका व्यक्तीने जो सायकलवर होता त्याने माझ्या छातीला स्पर्श करत जोरात मारलं आणि पुढे निघून गेला. तो जवळपास १४-१५ वर्षांचा मुलगा असेल. मला माहीत नाही यामागचा त्याचा काय उद्देश होता, त्याला कोणता आनंद मिळणार होता पण, त्याने मला खूप जोरात मारल्यानंतर मला त्रास झाला.”
समीराने पुढे सांगितलं की त्या मुलाने चुकीच्या मुलीला छेडला कारण तिने नंतर त्याला पकडलं आणि त्याला धडा शिकवल्याचं सांगितला आहे. समीरा म्हणाली, “मला माहीत नाही कसं पण, त्यावेळी मी फार धावनारी मुलगी नव्हते पण तो प्रसंग घडल्यानंतर मला राग आला आणि मी त्याच्यामागे धावले आणि त्याला खाली पाडून त्याला अद्दल घडवली.”
समीरा पुढे म्हणली, “मला त्यावेळी खूप त्रास झाला होता की माझ्याबरोबर असं का झालं, “त्याने असं का केलं आजही कधी कधी तो प्रसंग मला आठवतो. आता आई झाल्यानंतर मी याकडे अधिक गांभीर्याने पाहते आणि माझ्या मुलीलाही सावध राहण्याचा सल्ला देते. आपल्याकडे आता यासाठी शिक्षणही दिलं जातं. जागृकता निर्माण केली जाते.”
