"त्यावेळी मला ब्रेस्टला पॅडिंग करायला लावायचे..." समीरा रेड्डीने समोर आणली बॉलिवूडची काळी बाजू | samira reddy opens up about dark side of bollywood | Loksatta

“त्यावेळी मला ब्रेस्टला पॅडिंग करायला लावायचे…” अभिनेत्री समीरा रेड्डीने समोर आणली बॉलिवूडची काळी बाजू

मनोरंजन सृष्टीतील तिचा प्रवास सोपा नव्हता.

samira

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी ही तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. मनोरंजन सृष्टीतील तिचा प्रवास सोपा नव्हता. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर २०१२ पासून ती मनोरंजन सृष्टीपासून लांब आहे. तिला प्रेग्नन्सीदरम्यान अनेक समस्या आल्या, तिचं वजनही वाढलं. वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण इतकंच नाही, आता तिने बॉलिवूडची काळी बाजू उघड केली आहे.

समीरा मनोरंजन सृष्टीपासून जरी लांब असली तरीही ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता नुकतीच तिने ‘मिड-डे’ला एक मुलाखत दिली. तेव्हा तिने बॉलिवूडमधील वाईट अनुभवांबद्दल भाष्य केलं. हिंदी चित्रपट सृष्टीत काम करताना तिला ब्रेस्टला पॅडिंग करायला लावायचे आणि त्यावेळी अनेकांनी तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता, असा धक्कादायक खुलासा तिने केला.

आणखी वाचा : “मी सेमी प्रेग्नंट…” वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर करत उर्फी जावेदचं मोठं वक्तव्य

ती म्हणाली, “माझा सर्वात मोठा ब्रेकडाउनचा काळ माझ्या गरोदरपणानंतर सुरू झाला. मी माझ्याबद्दल, माझ्या शरीराबद्दल, करिअरबद्दल फार वाईट विचार करू लागले होते. अशा मानसिक स्थितीत गेले होते जिथून परतणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी घरात लपून बसायचे, कोणाशीही बोलायचे नाही. माझी मानसिक स्थितीही चांगली नव्हती. या सगळ्या नकारात्मक विचारांतून बाहेर पडण्यासाठी मला दोन-तीन वर्ष लागली. मी यातून बाहेर पडल्यानंतर मानसिकदृष्ट्या संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला मदत करायची हे माझं ध्येय होतं.”

हेही वाचा : “तुझ्यात मजा नाही…” जेव्हा बॉलिवूड अभिनेत्याने समीरा रेड्डीवर केली होती अश्लील टीका

पुढे ती म्हणाली, “त्यावेळी माझ्या वाढत्या वजनामुळे अनेकांनी मला भरपूर ट्रोल करण्यात आलं. त्यावेळी मी पूर्ण दिवस उपाशी राहायचे आणि वजन वधू नये म्हणून फक्त एक इडली खायचे. जवळपास १० वर्षांपूर्वी एक असा विचित्र काळ होता, जेव्हा इंडस्ट्रीतील अनेकजण प्लास्टिक सर्जरी करत होता. मलाही अनेकांनी चेहऱ्याची सर्जरी करण्याचाही सल्ला दिला होता. तसंच मला माझ्या ब्रेस्टसाठी नेहमी पॅड लावायला लागायचे. यामुळे मला नेहमी ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला जात होता.” समीराच्या या बोलण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:40 IST
Next Story
शाहरुखच्या चाहत्याची कमाल; ‘पठाण’साठी अपंग मित्राला पाठीवर घेत गाठलं दुसरं राज्य