scorecardresearch

“मी स्वत:ला चितेवर जळताना…” इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा

इस्लाम धर्मासाठी सनाने बॉलिवूड सोडून ग्लॅमरपासून दूर गेल्याचं म्हटलं होतं.

sana khan news
इस्लाम धर्मासाठी सनाने बॉलिवूड सोडून ग्लॅमरपासून दूर गेल्याचं म्हटलं होतं. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री सना खानने २०२० साली मनोरंजनविश्वाला रामराम ठोकला. इस्लाम धर्मासाठी सनाने बॉलिवूड सोडून ग्लॅमरपासून दूर गेल्याचं म्हटलं होतं. सनाने २०२१ मध्ये अनस सय्यद सिंगबरोबर निकाह केला. सनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खतरो के खिलाडी या रिएलिटी शोची ऑफर मिळाल्याचा खुलासा केला आहे.

सना ‘खतरो के खिलाडी ६’ ची स्पर्धक होती. या पर्वातील टॉप १० स्पर्धकांपैकी ती एक होती. यानंतर ‘खतरों के खिलाडी १०’ साठीही विचारणा झाल्याचा खुलासा सनाने केला आहे. पण सनाने या रिएलिटी शोला नकार दिल्याचं सांगितलं आहे. सना व तिचा पती अनस सय्यदने इकरा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. “एवढे पैसे बघितल्यानंतर शैतानबरोबर लढणं कठीण होईल”, असं ती म्हणाली.

हेही वाचा>> Tu Jhoothi Main Makkar: रणबीर-श्रद्धाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली! ‘तू झूठी मैं मक्कार’ने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

सनाने या मुलाखतीत २०१९ मध्ये तिला पडणाऱ्या स्वप्नाबाबतही उल्लेख केला आहे. सना म्हणाली, “रमजानच्या महिन्यात मला अनेक स्वप्न पडायची. शेवटच्या दिवसांत मी स्वत:ला चितेवर जळताना पाहायचे. मदतीसाठी मी ओरडत आहे, असंही मला दिसायचं. मला झोपही लागायची नाही, कारण मी खूप घाबरले होते. सुरुवातीला मला हे स्वप्न आहे, असं वाटायचं. त्यानंतर माझ्यात बदल दिसून आले. मी कोणशी बोलूही शकत नव्हते. कारण बोललं की लोक तुमच्याविषयी मत बनवतात. माझ्या आयुष्यातील तो सगळ्यात कठीण काळ होता”.

हेही वाचा>> ५६ व्या वर्षी वडील झालेल्या सतीश कौशिक यांना वाटायची खंत, म्हणाले होते “मुलीमागे पळणं मला…”

सनाने तेव्हा मनोरंजनच्या ग्लॅमरपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. लाइफस्टाइलमध्ये बदल करुन नेहमी हिजाब घालणं तिने मान्य केलं होतं. त्याच काळात खतरों के खिलाडीची ऑफर मिळाली होती. सनाच्या पतीने तिला ऑफर स्वीकारण्यासाठी मंजुरी दिली होती. परंतु, सनाने खतरों के खिलाडीची ऑफर नाकारली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 17:41 IST
ताज्या बातम्या