बऱ्याच हिंदी चित्रपटांसह 'बिग बॉस'मध्ये झळकलेल्या सना खानने २०२०मध्ये धर्मासाठी इंडस्ट्रीला रामराम केला. सनाने इस्लाम धर्म स्वीकारून सूरतच्या व्यावसायिक मौलाना अनस सय्यदबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर सना आई झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. ५ जुलै २०२३ला सनाने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. तारिक जमील असं सना व अनसच्या मुलाचं नाव असून आज दोघांनी वर्षभरानंतर मुलाची पहिली झलक दाखवली आहे. सना खान व अनस तारिक जमीलच्या जन्मापासून त्याचा चेहरा लपवत होते. सोशल मीडियावरही आपल्या लाडक्या लेकाचा व्हिडीओ शेअर करताना चेहरा लपवायचे. त्यामुळे सनाचे चाहते तारिक जमीलला पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. अखेर सनाने वर्षभरानंतर आपल्या मुलाचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. तिनं तारिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेही वाचा - Video: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’, अमृता खानविलकरचा छोट्या पुष्पाबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ सनाने शेअर केलेल्या व्हिडीओतून, तारिक जमीलचा गोड अंदाज पाहायला मिळत आहे. चिमुकला तारिक मस्ती करताना दिसत आहे. तसंच वडिलांबरोबरचे त्याचे खास क्षण व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सनाने आज आपल्या लेकाचा गोड व्हिडीओ शेअर करत त्याचं इन्स्टाग्रामवर अकाउंट देखील सुरू केलं आहे. हेही वाचा - Video: “अरमान मलिकला बाहेर काढा”, विशाल पांडेच्या आई-वडिलांनी भावुक होत ‘बिग बॉस’ला केली विनंती, म्हणाले… View this post on Instagram A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21) तारिक जमीलच्या हा व्हिडीओ पाहून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसह सनाच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री युविका चौधरी, भारती सिंग, किश्वर राय अशा बऱ्याच कलाकारांनी सनाच्या मुलाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. तसंच तारिकच्या गोंडसपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत. हेही वाचा - Video: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी झाली ग्रह शांती पूजा; पारंपरिक लूकमध्ये दिसली अंबानींची होणारी सून तारिक जमील नावाचा अर्थ काय? दरम्यान, सना खानने 'इ-टाइम्स'शी संवाद साधताना मुलाच्या नावामागचा अर्थ सांगितला होता. ती म्हणाली होती, "असं म्हणतात की नावाचा माणसावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळेच आम्हाला पवित्रता, सौम्यता, काळजी आणि प्रामाणिकपणा दर्शवणारे नाव हवं होतं. जमील म्हणजे सौंदर्य आणि तारिक म्हणजे आनंददायी."