Sanam Teri Kasam: रोमँटिक चित्रपट ‘सनम तेरी कसम’ पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला आणि या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लागलं. ९ वर्षांपूर्वी प्रेक्षकांनी पाठ फिरवलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. तेव्हा रिलीज झाल्यावर बजेटची निम्मी रक्कमही न कमवू शकलेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस गाजवत आहे. चित्रपटाने थिएटरमध्ये १० दिवस पूर्ण केले आहेत. या १० दिवसांत त्याने दमदार कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॅलेंटाईन डेच्या एक आठवडा आधी ७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. सिनेमाने १० दिवसात बॉक्स ऑफिसवर ३५ कोटींहून जास्त कमाई केली आहे.

नऊ वर्षांनंतर री-रिलीज झाल्यावर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात प्रभावी कामगिरी केली. ‘सनम तेरी कसम’ने राही बर्वेंच्या ‘तुंबाड’च्या कलेक्शनला मागे टाकलं आहे. या आठवड्यात विकी कौशलचा ‘छावा’ रिलीज झाल्यामुळे ‘सनम तेरी कसम’च्या कमाईत घसरण झाल्याचं दिसून आलं.

‘सनम तेरी कसम’ने १० दिवसांत देशभरात ३६.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दसुरीकडे सोहम शाहच्या ‘तुंबाड’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३४ कोटी होती. री-रिलीजनंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘तुंबाड’ चित्रपट होता. मात्र त्याहून जास्त कमाई करत आता ‘सनम तेरी कसम’ हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. सध्या ‘सनम तेरी कसम’ला ‘छावा’कडून चांगलीच टक्कर मिळत आहे.

पाहा पोस्ट –

इंदर व सरू यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भावली आहे. ‘सनम तेरी कसम’ ने चित्रपटाचे ९ वर्षांपूर्वीचे लाइफटाईम कलेक्शन फक्त ९ कोटी रुपये होते. पुन्हा रिलीज झाल्यानंतर, त्याने मूळ कलेक्शनपेक्षा चार पट जास्त कमाई केली आहे. राधिक राव आणि विनय सप्रू यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मिती ‘सनम तेरी कसम’चे बजेट २५ कोटी रुपये होतं. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनचा हा पहिला भारतीय सिनेमा होता. तर हर्षवर्धन राणेने या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याचा हर्षवर्धनच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. पण आता ९ वर्षांनी या चित्रपटाने त्याचा निर्मिती खर्च वसूल केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanam teri kasam beats tumbbad re release collection harshvardhan rane mawra hocane film hrc